Categories: देश

Manipur Viral video | महिलांवर अत्याचार करणाऱ्या नराधमाचे घर ‛जाळले’, व्हायरल व्हिडिओ समोर आल्यानंतर देशभरात संतापाची लाट

मणिपूर : मणिपूर येथील दोन महिलांवरील अत्याचाराचा व्हिडीओ व्हायरल (Manipur Viral Video) झाल्यानंतर आता देशभरात संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. दोन महिलांवर बलात्कार करत त्यांची नग्न धिंड काढणाऱ्या मुख्य आरोपी हेरादास खुयरेम याचे स्थानिक महिलांनी घर जाळले आहे. या प्रकरणात आत्तापार्यंत चारजणांना अटक करण्यात आली असून या व्हिडिओच्या आधारे यात सहभागी असणाऱ्या आरोपींचा मणिपूर पोलीस शोध घेत आहेत.

अत्याचाराची ही घटना मे महिन्यात घडली होती. त्या घटनेचा व्हिडीओ काल व्हायरल झाल्यानंतर मात्र संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली आहे.या दोन महिलांच्या भावाला जीवे मारून नंतर या महिलांना निर्वस्त्र करून अनेक पुरुषांनी या महिलांवर लैंगिक अत्याचार केल्याचे तपासातून समोर येत आहे. अंगावर काटा आणणारा आणि मानवतेला काळिमा फासणारा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावरही या घटनेची निंदा करण्यात आली आहे.

हा व्हिडीओ समोर आल्यानंतर मणिपूर मधील महिलांनी यातील मुख्य आरोपी हेरादास खुयरेम याचे घर जाळून टाकले आहे. येथील आदिवासी संघटनांनी केलेल्या दाव्यानुसार या दोन महिलांना निर्वस्त्र करून त्यांना रस्त्यावर फिरविण्यात आले नंतर त्यांना शेतामध्ये घेऊन जात तेथे अनेक पुरुषांनी या दोन महिलांवर सामुहिक बलात्कार केला. त्यानंतर पुन्हा त्या पिडीत महिलांना नग्नावस्थेत रस्त्यावरुन फिरवण्यात आले. ही धक्कादायक घटना मे महिन्यातील असून राजधानी इम्फाळपासून 35 किलोमीटरवर असलेल्या कांगपोकपाई जिल्ह्यामध्ये ही घटना घडल्याची सांगितले गेले आहे.

आत्तापार्यंत चार जणांना अटक, अनेकांचा शोध सुरू

मणिपूर पोलिसांनी या प्रकरणामध्ये अपहरण, सामुहिक बलात्कार आणि खूनाच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. आत्तापर्यंत यातील चार आरोपींना अटक करण्यात आली असून अन्य आरोपींचा शोध सुरू आहे.

Team Sahkarnama

Recent Posts

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

3 तास ago

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार – मा.नगराध्यक्ष बादशाह शेख

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…

5 तास ago

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

7 तास ago

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

1 दिवस ago