दौंड : चौफुला (धायगुडेवस्ती) ता.दौंड.जि.पुणे या गावच्या हद्दीमध्ये सोपं धायगुडे यांच्या चाळीमधील एका रूमच्या समोर असणाऱ्या पत्र्याच्या ओरांड्यामध्ये एका अनोळखी इसमाचा मृतदेह आढळून आला आहे.
यवत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार दि. 25/09/2021 रोजी घटनेची खबर देणार सोपान सोनबा धायगुडे हे त्यांच्या घरी असताना दुपारी तीन च्या सुमारास त्यांची बहिण लक्ष्मी शिवाजी चोरमले (रा.चौफुला धायगुडेवस्ती) हिने सोपान धायगुडे यांना फोन वरून कळविले की त्यांच्या चाळीतील पुर्वेकडुन पहिल्या रूमचे समोर पत्र्याचे ओरंडयामध्ये कोणीतरी बेवारस पुरूष जातीचा अनोळखी इसम नाव पत्ता माहिती नाही (वय अंदाजे 55 वर्षे) हा झोपले स्थितीत पडलेला असुन त्याचंे शरीराची हालचाल होताना दिसत नाही.
हि माहिती त्यांच्या बहिणीने त्यांना कळविल्याने धायगुडे यांनी सदर ठिकाणी जावुन खात्री केली असता तेथे असलेल्या पुरुषाच्या शरीराची हालचाल होत नसल्याने व श्वासोच्छवास बंद असल्याचे त्यांना जाणवले. त्यांनी त्यास लोकांचे मदतीने अॅब्युलन्स मधुन यवत ग्रामीण रूग्णालय येथे नेले असता डाॅक्टंरांनी त्यास तपासुन तो मयत झाल्याचे सांगितले.
सदर मयताचे येथे कोणही नातेवाईक मिळुन येत नसल्याने पोलीस त्याच्या नातेवाईकांचा शोध घेत असून पोलीस ठाण्यात पोसई जगताप यांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून पुढिल तपास पोना जाधव हे करीत आहेत.