Man arrested in Marriage Anniversary – बायको सोबत वाढदिवस साजरा केला अण थेट तुरुंगात गेला..

| सहकारनामा |

औरंगाबाद : बायको सोबत लग्नाचा वाढदिवस साजरा केला म्हणून कोणी तुरुंगात कसा जाईल असा प्रश्न तुम्हा सर्व वाचक मित्रांना पडला असेल पण हे खरं आहे आणि हि घटना औरंगाबाद मध्ये घडली आहे.

तर त्याच झालं असं की दीपक सरकटे नावाच्या व्यक्तीने आपला लग्नाचा वाढदिवस आपल्या पत्नीसोबत साजरा केला हा वाढदिवस साजरा करताना त्याने एक मोठी चूक केली आणि त्याचे परिणाम त्याला भोगावे लागले आहेत.

आता हि चूक काय होती तर दीपक सरकटे याने आपल्या पत्नीसोबत लग्नाच्या वाढदिवसाचा केक कापताना चक्क आपल्या बायकोच्या हातात तलवार दिली आणि मग दोघांनी हा केले आनंदात कापून एक दुसऱ्याला भरवला. या लग्नाच्या वाढदिवसाचे व्हिडीओ ज्यावेळी सोशल मीडियावर व्हायरल झाले त्यावेळी मात्र पोलिसांनी या व्यक्तीचा शोध घेण्यास सुरुवात केली आणि तो विश्रांतीनगर येथे राहत असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी त्याच्या घरी जाऊन त्यास ताब्यात घेतले. 

पोलिसांनी दिपकला ताब्यात घेताच त्यास आपली चूक लक्षात आली आणि त्याने आपल्या घरात असलेल्या पलंगाखालून तलवार काढून ती पोलिसांच्या स्वाधीन केली. यानंतर पोलिसांनी दीपक सरकटे या व्यक्तीवर गुन्हा दाखल करत त्याची रवानगी जेलमध्ये केली.

Sahkarnama

Recent Posts

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

20 तास ago

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

1 दिवस ago

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार – मा.नगराध्यक्ष बादशाह शेख

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…

1 दिवस ago

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

2 दिवस ago

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

2 दिवस ago