दौंड : दौंड शहरामध्ये दिवसेंदिवस अल्पवयीन मुलींच्या छेडछाडीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे दिसत आहे. गेल्या काही दिवसांमध्ये अल्पवयीन मुलींचे विनभंग होत असतानाच आता पुन्हा एकदा अशीच एक घटना समोर आली आहे. या प्रकरणी आरोपी बाबा चाँद शेख (राहणार दौंड शहर) याला दौंड पोलिसांनी अटक केली आहे.
दौंड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि.09/04/2025 रोजी रात्री 8.30 च्या सुमारास यातील फिर्यादी या रमापतीनगर,गवळीवस्ती येथून घरी येत असताना त्यांच्या शेजारी राहणार इसम बाबा चाँद शेख हा फिर्यादीच्या राहते घरासमोर येवून घरासमोर थांबलेली फिर्यादीची लहान मुलीस वाईट हेतून मिठ्ठी मारत असताना त्यास पाहिले. त्यावेळी फिर्यादी यांची मुलगी त्यास पाहून घाबरून तिथेच त्यास दोन्ही हाताने प्रतिकार करीत होती.
त्यावेळी फिर्यादी यांनी बाबा शेख माझ्या मुलीला सोड, तिला मिठ्ठी का मारतो असे मोठयाने ओरडल्या. त्यावेळी आरोपी याने फिर्यादीस जतीवाचक शिवीगाळ करत तुम्ही खुप माजले आहात असे म्हणून शिवीगाळ केली व झालेला प्रकार कोणाला सांगितल्यास तुम्हाला जिवे मारून टाकेल असे म्हणून तेथून निघून गेला.
त्यावेळी फिर्यादी पळत मुलीकडे गेली असता तिची मुलगी हि घाबरून रडत होती. बाबा शेख याला आम्ही जातीने कोण आहोत हे माहित असून देखील त्याने माझी मुलगी हिस वाईट हेतून जबरदस्तीने मिठ्ठी मारून तिचे मन्नास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केलेले आहे म्हणून बाबा चाँद शेख (रा.भिमनगर ता.दौंड जि पुणे) याच्याविरूध्द मी फिर्याद देत असल्याचे फिर्यादित नमूद करण्यात आले आहे. घटनेचा पुढील तपास बापुराव दडस सो, (उपविभागीय पोलीस अधिकारी दौड विभाग) हे करीत आहेत.