दौंड | मॅमोग्राफीमुळे कॅन्सरचे निदान लवकर होणार

दौंड : सह्याद्री इंडस्ट्रीज पुणे व रोटरीक्लब पुणे फारईस्ट, रोटरी इंटरनॅशनल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दौंड या ठिकाणी महालक्ष्मी मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल येथे मोफत डायलिसिस मशीन व मॅमोग्राफी मशीन देण्यात आली आहे. दौंड शहर परिसर व आजूबाजूच्या सर्व तालुक्यांमध्ये मॅमोग्राफी या मशीनची निकड लक्षात घेत आयोजकांनी मशीनसाठी सहकार्य केले आहे.

स्तनाच्या कॅन्सरचे लवकरात लवकर निदान व्हावे व त्या माध्यमातून सर्व महिलांना याचा लाभ मिळावा व त्याचबरोबर दौंड शहर आणि परिसरामध्ये वाढलेले डायलेसिसच्या पेशंटचा विचार करता डायलिसिस मशीनही देण्यात आली. त्या प्रसंगी सह्याद्री इंडस्ट्रीचे सन्माननीय उपस्थित होते. तसेच पुणे फॉरेस्ट क्लबचे अध्यक्ष, त्याचबरोबर मेंबरशिप डायरेक्टर व रोटरी थ्री वन थ्री वन चे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर रोटरीन अनिल परमार , दौंड शहर आणि परिसरातील सर्व डॉक्टर्स ,समाजसेवी संस्था चे पदाधिकारी उपस्थित होते.

या कार्यक्रमामुळे निश्चितच गोरगरीब जनतेची सेवा रोटरीच्या माध्यमातून होईल असा विश्वास सर्वांनी व्यक्त केला. दौंड शहरात आणि परिसरातील महिलांना आता मॅमोग्राफी मशीन मुळे स्तनाचा होणारा कॅन्सर याचे निदान लवकरात लवकर होण्यास मदत होणार आहे त्यामुळे निश्चितच कॅन्सरचा वाढता प्रभाव आटोक्यात येण्यासाठी ही मशीन खूप महत्त्वाची ठरेल अशी माहिती रोटरीचे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर रोटेरियन डॉ. अनिल परमार यांनी दिली.

याप्रसंगी दौंड रोटरी क्लबचे अध्यक्ष डॉ. राजेश दाते ,सचिव रोटर आमिर शेख ,महालक्ष्मी हॉस्पिटलच्या संचालिका डॉ.शलाका लोणकर ,डॉ. दत्तात्रय लोणकर , रोटरी क्लब चे सर्व सन्माननीय सदस्य उपस्थित होते.