Categories: क्राईम

मळद विद्यार्थिनींच्या लैंगिक छळ प्रकरणातील दोन्ही शिक्षकांचा तुरुंगातील मुक्काम वाढला |  न्यायालयाने इतक्या दिवस वाढवली पोलीस कोठडी

अख्तर काझी

दौंड : दौंड तालुक्यातील मळद येथील माध्यमिक विद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थिनींचा विनयभंग व लैंगिक छळ करण्याप्रकरणी दौंड पोलिसात गुन्हा दाखल असलेल्या मुख्याध्यापक सुभाष वाखारे व मुख्य आरोपी शिक्षक बापूराव धुमाळ या दोघांचा तुरुंगातील मुक्काम आणखीन वाढला आहे.

सदर प्रकरणी दोन्ही आरोपींना दौंड पोलिसांनी अटक केल्यानंतर दि. 23 ऑगस्ट रोजी त्यांना न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने दोघांना 29 ऑगस्ट (7 दिवस) पर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. आरोपींच्या पोलीस कोठडीची मुदत संपल्याने त्यांना आज पुन्हा न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने 31 ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडीत वाढ केली असल्याची माहिती तपास अधिकारी सहा. पो. निरीक्षक तुकाराम राठोड यांनी दिली.

विद्यार्थ्यांना गुरु समान असणाऱ्या शिक्षकानेच विद्यार्थिनींचा लैंगिक छळ केल्याची घटना उघडकीस आल्यानंतर शिक्षकाच्या या संताप जनक कृत्याचा संपूर्ण तालुक्यातून निषेध करण्यात आला, अनेक राजकीय नेत्यांनी मळद ग्रामस्थांची भेट घेत या घटनेचा निषेध केला व आरोपींना कठोर शिक्षेची मागणी केली आहे. सदरचा खटला जलद गती न्यायालयात चालविला जावा, या प्रकरणात विशेष सरकारी वकिलाची नेमणूक करण्यात यावी, आरोपींना कठोर शासन करण्यात यावे तसेच दोघा आरोपींना सेवेतून तत्काळ बडतर्फ करण्यात यावे अशी मागणी मळद ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे.

आमदार राहुल कुल यांनीही मळद ग्रामस्थांची भेट घेतली, यावेळी दौंड चे पोलीस निरीक्षक संतोष डोके उपस्थित होते. शाळेतील अल्पवयीन मुलींच्या बाबतीत घडलेला प्रकार हा अतिशय दुर्दैवी असून आरोपींची कोणत्याही प्रकारे गय केली जाणार नाही. याबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन कठोर कारवाईची मागणी करणार असून शाळा, कॉलेजमध्ये शिकणाऱ्या मुलींच्या संरक्षणासाठी उपाययोजना करण्याची देखील मागणी करणार असल्याचे राहुल कुल यावेळी म्हणाले.

Team Sahkarnama

Recent Posts

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

9 तास ago

दौंडमध्ये चिमुकलींचा विनयभंग, 3 उंटवाल्यांना पोक्सो कायद्यान्वये अटक

दौंडमध्ये चिमुकलींचा विनयभंग, 3 उंटवाल्यांना पोक्सो कायद्यान्वये अटक

3 दिवस ago

पुणे ग्रामिण पोलिसांची दमदार कामगिरी | उरुळी कांचन गोळीबार प्रकरणातील आरोपिंना अटक, बंदुकीची 175 तर पिस्तूलाची 40 काडतुस हस्तगत

पुणे ग्रामिण पोलिसांची दमदार कामगिरी | उरुळी कांचन गोळीबार प्रकरणातील आरोपिंना अटक

4 दिवस ago

फक्त कर्ज द्या अण वसूल करा इतकेच सहकारी सोसायट्यांचे काम राहिले नाही, आता 151 प्रकारचे व्यवसाय सुरु करता येणार – सहकारमंत्री

फक्त कर्ज द्या अण वसूल करा इतकेच सहकारी सोसायट्यांचे काम राहिले नाही, आता 151 प्रकारचे…

4 दिवस ago