कुल – थोरात गटात महा डावपेचांना सुरुवात.. केडगाव पंचायत समिती गणात ‘नहले’ पे ‘दहला’

अब्बास शेख

केडगाव (दौंड) : दौंड तालुक्यात मिनी विधानसभा म्हणजेच जिल्हा परिषद, पंचायत समितीची निवडणूक आता रंगात येऊ लागली आहे. कुल आणि थोरात गटात यावेळी कमालीची टक्कर होणार असे दिसत आहे. ॲड. राहुल कुल हे तिसऱ्यांदा आमदार झाल्यानंतर कुल गटाचा उत्साह आणि आत्मविश्वास वाढला होता मात्र दौंड नगरपरिषदेत मोठ्या मताधिक्याने राष्ट्रवादीच्या नगराध्यक्षा निवडून आल्याने आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचाही आत्मविश्वास वाढला आहे. दौंड तालुक्यात सर्वात जास्त लक्ष लागून असलेल्या बोरिपार्धी – केडगाव झेड पी गटातील पंचायत समिती गणात आता नेहले पे देहला करण्यासाठी अनेक डावपेच आखले जात असल्याचे आता दिसत आहे.

दौंड तालुक्यात सात जिल्हा परिषद गट आणि चौदा पंचायत समिती गण आहेत. यात सर्वात जास्त लक्ष हे बोरिपार्धी – केडगाव गटाकडे लागले आहे. या ठिकाणी माजी आमदार रमेश थोरात यांचे पुत्र उभे राहणार असून आमदार राहुल कुल गटाकडून भीमा पाटस चे माजी उपाध्यक्ष आनंद थोरात यांचे पुत्र अभिषेक थोरात हे या गटात आव्हान देणार आहेत असे एकंदरीत चित्र स्पष्ट होत चालले आहे. या गटात ओपन ला ओबीसी चे आव्हान असल्याने ओबीसी मते आपल्या पदरात पाडण्यासाठी थोरात गट केडगाव गणात ओबीसी पुरुष उभा करुन बरोबरी साधण्याचा प्रयत्न करेल असे एकंदरीत दिसत आहे.

केडगाव पंचायत समिती गणासाठी सर्वसाधारण आरक्षण असून बोरिपार्धी गणासाठी सर्वसाधारण महिला असे आरक्षण आहे. या ठिकाणी केडगाव, खुटबाव गणात ओबीसी उमेदवार आणि बोरिपार्धी गणात सर्वसाधारण स्त्री देण्याचा प्रयत्न थोरात गट करेल तर कुल गट या ठिकाणी ओबीसी पुरुष देत असल्याने खाली दोन्ही गणात कुल गटाकडून ओपन उमेदवार देण्यात येईल असे एकंदरीत चित्र दिसत आहे.

कुल आणि थोरात यांची रणनीती – तुषार थोरात यांना धनगर समाजाचे नेते आनंद थोरात यांचे चिरंजीव कुल गटाचे अभिषेक थोरात हे आव्हान देणार असल्याने त्यांना सर्व स्तरांतून मतदान होईल ओपन उमेदवाराला करतील मोठा धोका निर्माण होईल त्यामुळे रमेश आप्पा थोरात गटाने धनगर समाजाचा एक उमेदवार जर केडगाव गणात दिला तर मात्र फुटाफूट होण्याची शक्यता कमी असेल अशी एकंदरीत चर्चा केडगावमध्ये होत आहे. त्यामुळे कुल गटाने ओपन गटातून लढणाऱ्या तुषार थोरात यांना अभिषेक थोरात यांच्या रुपाने ‘नहला’ दिल्याने आता थोरात गटाकडून केडगाव गणात ओपन च्या जागी ओबीसी पुरुष पाराजी हंडाळ किंवा दिलीप हंडाळ यांच्या रुपाने ‘दहला’ देन्याच्या तयारीत असल्याचे वृत्त सूत्रांकडून समजत आहे. त्यामुळे आता कोण कुणाला नेहले पे देहला देतोय हे लवकरच समजणार आहे.