Categories: क्राईम

राजकीय नेत्याच्या दौंड येथील मटका अड्डयावर छापा! चौघांना अटक, 50 हजारांचा मुद्देमाल जप्त

पुणे : पुणे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख यांना मिळालेल्या बातमीवरून विशेष पथकाने दौंड येथे कल्याण मटका जुगार अड्डयावर कारवाई करून ४ आरोपींना ताब्यात घेतले असून त्यांचेकडून सुमारे ५० हजाराचा माल जप्त केल्याची माहिती पुणे ग्रामीण सायबर पोलीस स्टेशनचे सहा. पोलीस निरीक्षक सचिन कांडगे यांनी दिली.
पुणे ग्रामीण जिल्हयाचे पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख यांना दौंड शहरामध्ये आंबेडकर चौकाजवळील नेने चाळ येथे एका दुकानात राजेश उर्फ बंटी जाधव व रमेश जाधव हे दोघे आपले हस्तकांकरवी कल्याण व तारा मटका नावाचा जुगार अड्डा चालवित असल्याची माहिती मिळाली होती. त्यावरून त्यांनी प्रोबेशनरी आय.पी.एस. श्री.तेगबिरसिंग संधू व सहा. पोलीस निरीक्षक सचिन कांडगे यांना माहिती काढून विशेष पथकामार्फत कडक कारवाई करणेबाबतच्या सुचना दिलेल्या होत्या. त्याप्रमाणे दिनांक २६ मार्च २०२२ रोजी प्रोबेशनरी आय.पी.एस. श्री.तेगबिरसिंग संधू , सहा. पोलीस निरीक्षक सचिन कांडगे, महेश गायकवाड व श्रीधर जगदाळे यांचे पथकाने दौंड शहरात मटका अड्डा चालत असलेल्या ठिकाणी साध्या वेशात जावून टेहळणी करून माहिती काढून सायंकाळी ०५.३० वा. चे सुमारास अचानक छापा टाकला असता तेथे १) रमेश शामराव जाधव (वय ५० वर्षे रा.दौंड, गोवा गल्ली ता.दौंड जि.पुणे) २) अजय नागनाथ जाधव (वय ४९ वर्षे रा.दौंड, आंबेडकर चौक ता.दौंड जि.पुणे) ३) आयु मौलाबक्ष शेख (वय ५२ वर्षे रा.दौंड, खाटी गल्ली ता.दौंड जि.पुणे) ४) सौदागर सिदाराम नरगमकर (वय ६० वर्षे रा . दौंड, शालिमार चौक ता. दौंड जि.पुणे) असे पावती पुस्तकावर आकडेमोड करून स्लिपा देवून कल्याण मटका नावाचा जुगार खेळवित व खेळत असताना आपले कब्जात रोख रक्कम २५,६२०/- तसेच मटका जुगार स्लीप बुके व इतर साहित्य असा एकूण रुपये ५०,८५०/- (पन्नास हजार आठशे पन्नास) रुपयाचा माल बाळगलेले मिळून आले. त्यांना ताब्यात घेवून त्यांचेकडे चौकशी केली असता रमेश शामराव जाधव व त्याचा भाऊ राजेश उर्फ बंटी शामराव जाधव (रा.दौंड) हे दोघे मटका अड्डा चालवित असल्याचे व महेश प्रभाकर जोगळेकर रा.दौंड यांनी सदर दुकानाची जागा त्यांना मटका अड्डा चालविण्यासाठी दिली असल्याचे निष्पन्न झालेले आहे. त्यामुळे त्या सर्वांचे विरूद्ध दौंड पोलीस स्टेशनला मुबई जुगार कायदा कलम ४, ५ प्रमाणे गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात आलेली आहे.
मटका अड्डयावर मिळून आलेले ४ आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील कारवाईसाठी दौंड पोलीस स्टेशनचे ताब्यात देण्यात आलेला असून मटका अड्डा चालविण्यामध्ये आणखीन कोणी सहभागी आहेत काय? तसेच मटका अड्डयाचा पुढील कोण सुत्रधार आहे? याबाबतचा अधिक तपास दौंड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विनोद घुगे हे करीत आहेत.
यातील निष्पन्न आरोपी राजेश उर्फ बंटी जाधव हा सध्या राजकिय पदावर कार्यरत असून त्याचेवर यापूर्वी गर्दीमारामारी १, जुगार ५ व सावकारी कायदा १ असे एकूण ७ गुन्हे दाखल आहेत. तसेच अटक आरोपी रमेश जाधव याच्यावर यापूर्वी जुगार कायदयान्वये एकूण ११ गुन्हे दाखल आहेत.
सदरची कारवाई ही पुणे ग्रामीण जिल्हयाचे पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख, बारामती विभागाचे अपर पोलीस अधीक्षक मिलींद मोहिते यांचे मार्गदर्शनाखाली प्रोबेशनरी आय.पी.एस. तेगबिरसिंग संधू , सहा. पोलीस निरीक्षक सचिन कांडगे, महेश गायकवाड व श्रीधर जगदाळे यांनी केलेली आहे.

Team Sahkarnama

Recent Posts

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

1 तास ago

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार – मा.नगराध्यक्ष बादशाह शेख

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…

3 तास ago

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

5 तास ago

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

1 दिवस ago