खुटबाव वि.का.सोसायटीच्या चेअरमनपदी ‘महेश थोरात’ तर व्हाईस चेअरमनपदी ‘सुनील फणसे’ बिनविरोध

दौंड : खुटबाव विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी महेश थोरात आणि व्हाईस चेअरमनपदी सुनील फणसे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. खुटबाव हे माजी आमदार तथा जिल्हा बँकेचे अध्यक्ष रमेश थोरात यांचे गाव असून येथील ग्रामपंचायत आणि सोसायट्यांच्या निवडणुका रमेश थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली बिनविरोध पार पडत आल्या आहेत हे येथील वैशिष्ट्य आहे.

येथील सोसायटीमध्ये प्रत्येकाला समान संधी मिळावी यासाठी दरवर्षी चेअरमन आणि व्हाईस चेअरमन बदलले जाऊन प्रत्येक इच्छुकाला संधी मिळते. सध्याचे चेअरमन दत्तात्रेय थोरात आणि व्हाईस चेअरमन सचिन थोरात यांचा कार्यकाल पूर्ण झाल्याने त्यांनी राजीनामा दिला होता त्यानंतर महेश थोरात यांची चेअरमनपदी तर सुनिल फणसे यांची व्हाईस चेअरमनपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

खुटबाव विका.सेवा.सहकारी सोसायटीमध्ये एकूण 13 संचालक असून खुटबाव परिसरामध्ये या सोसायटीला शेतकऱ्यांची लाईफ लाईन म्हणून ओळखले जाते. या सोसायटीच्या चेअरमन व्हाईस चेअरमन निवडीवेळी निवडणूक अधिकारी म्हणून एन.टी. राठोड आणि हर्षित तावरे यांनी काम पाहिले. यावेळी भाऊसाहेब ढमढेरे, जी के थोरात, आर.डी. थोरात, शिवाजी थोरात, दशरथ थोरात, शरद शेलार हे मान्यवर आणि सर्व संचालक मंडळ उपस्थित होते.