बारामतीकरांमुळे दौंड चा विकास होत नाही असे म्हणणाऱ्यांनी बारामतीकरांची उमेदवारी का घेतली – महेश भागवत

दौंड : 2004 व 2009 मध्ये झालेल्या निवडणुकांमध्ये ज्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधात निवडणूक लढवून 2004 व 2009 ला भारतीय जनता पार्टीचे नेते वासुदेव काळे यांच्या हाता तोंडाला आलेला घास हिसकावून घेऊन स्वतः भाजप च्या पाठिंबा घेऊन निवडणूक लढवून प्रामाणिकपणे काम करणाऱ्या वासुदेव नाना काळे यांच्यावर दोनदा अन्याय केला. त्यावेळी हेच आताचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार म्हणाले होते की बारामतीकरांमुळे दौंड तालुक्याचा विकास होत नाही म्हणून मी भारतीय जनता पार्टीच्या पाठिंब्यावर निवडणूक लढवत आहे.

निवडणूक झालेवर तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद, पंचायत समिती, बाजार समिती, ह्या सगळ्या संस्था भाजपात विलीन करणार आहे असं त्यांनी जाहीर वक्तव्य केलेलं आहे, बारामतीकरांमुळे दौंड विकास होत नाही असं म्हणून ज्यांनी शरद पवार साहेब व अजितदादा पवार यांचेवर जाहीर आरोप केले असतील तर मग यांनी आता बारामतीकरांची उमेदवारी का घेतली याचा सुद्धा त्यांनी खुलासा करणे आवश्यक आहे, ज्यांनी बारामतीकरांमुळे दौंड विकास होत नाही असा शरद पवार साहेब, सुप्रिया ताई सुळे, अजित दादा पवार यांचेवर आरोप करून त्यांचा अपमान करून त्यांना बदनाम करन्याचा प्रयत्न केला हे या तालुक्यातील जनता विसरलेली नाही.

स्व. लोकनेते नानासाहेब पवार यांचे कुटुंब समाजकारण व राजकारणात गेली तीन पिढया शरद पवार साहेब यांचेशी प्रामाणिक राहून काम करत आहे, अश्या प्रामाणिक कुटुंबातील आप्पासाहेब पवार यांना या निवडणुकीत शरद पवार साहेबांची विधानसभेची उमेदवारी निश्चित झाली असताना तुम्ही ऐनवेळी तुम्ही ती हिसकावून घेऊन स्व. लोकनेते नानासाहेब पवार यांचे परिवारावर स्वतःचे राजकीय स्वार्थासाठी अन्याय करून त्यांना तीन पिढ्यांचा एकनिष्ठ व प्रामाणिकपना आपण मातीमोल केला हेही स्व. लोकनेते नानासाहेब पवार याचेंवर प्रेम करणारे त्यांचे विचाराचे कार्यकर्ते विसरणार नाहीत.

बारामतीकरांमुळे दौंडचा विकास होत नाही असे तुम्ही म्हणत असाल तर मग तुम्हाला बारामतीकरांची उमेदवारी का घ्यावी लागली तुमचे बारामतीकरांवर विश्वास नसून केवळ राजकीय स्वार्थासाठी तुम्ही आप्पासाहेब पवार यांचेवर अन्याय करून उमेदवारी मिळवली आहे हेही या तालुक्यातील जनतेला कळून चुकलेल आहे, हे न समजण्याइतपत आता तालुक्यातील जनता दूधखुळी राहिलेली नाही.  तालुक्यातील जनता सुज्ञ आहे, तुमचा डाव जनतेने ओळखलेला असून बारामतीकरांवर म्हणजेच मा.शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे व अजित दादा पवार यांचेवर तुम्ही आरोप करून त्यांना बदनाम करण्याचा जो प्रयत्न केला आहे. आप्पासाहेब पवार यांचेवर जो अन्याय केला आहे त्याचा या तालुक्यातील जनता योग्य विचार केल्याशिवाय राहणार नाही हेही तेवढंच सत्य असल्याचे शेवटी महेश भागवत म्हणाले.