महाविकास आघाडीचे उमेदवार रमेश थोरात यांच्याकडून मराठा समाजाची फसवणूक – वसंतराव साळुंखे

दौंड : महाविकास आघाडीचे उमेदवार रमेश थोरात यांनी मराठा समाजाच्या ओबीसी मधून आरक्षणाला व जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला यापुढे माझा पाठींबा राहील, तसा माझ्या जाहीरनाम्यात स्पष्ट उल्लेख केला जाईल असा विश्वास मराठा समाजाचे जरांगे पाटील यांना मानणारे उमेदवार वसंतराव साळुंखे यांना दिला होता. साळुंखे हे मराठा आरक्षणासाठी न्यायालयीन लढाई लढणारे, मराठा समाजाला कुणबीचे दाखले मिळावेत यासाठी तहसील कार्यालयात उपोषण करून दौंड तालुक्यातील १६ मंडल कार्यालयात सलग तीन महिने दर बुधवारी कॅम्प घेण्याची तहसीलदार यांचेकडे मागणी मान्य करून घेऊन कॅम्प लावणारे मराठा समाजाचे सेवक म्हणून ओळखले

अश्या वसंतराव साळुंखे यांना थोरात यांनी शब्द दिला होता. त्यामुळे यावर विश्वास ठेऊन वसंतराव साळुंखे यांनी उमेदवारी अर्ज माघारी घेऊन त्यांना जाहीर पाठिंबा दिला होता, परंतू रमेश थोरात यांनी त्यांचे प्रसिध्द केलेल्या निवडणुकीच्या जाहीरनाम्यात मराठा समाजाचे आरक्षण विषयी ठरल्याप्रमाणे एक अक्षराचाही उल्लेख केलेला नाही व त्यांचे प्रचार सभांमधील भाषणात ही कसलाच उल्लेख न करता मराठा समाजाचा विश्वासघात करून समाजाची दिशाभूल व फसवणूक केली असा आरोप वसंतराव साळुंखे यांनी केला आहे.

याउलट महायुतीचे उमेदवार राहुल कुल यांनी त्यांचे निवडणूक जाहीरनाम्यात मराठा, धनगर मुस्लीम समाजाचे आरक्षण बाबत पाठपुरावा करू असा उल्लेख केला आहे,यापूर्वी अनेकवेळा विधानसभेत मराठा समाजाचा आरक्षणाचा प्रश्न त्यांनी मांडला आहे. याचा समाज बांधवांनी विचार करून मराठा समाजाच्या मागणी साठी प्रामाणिक प्रयत्न कोण करणार आहे याचा रमेश थोरात व राहुल कुल या दोघांच्या जाहिरनाम्यातील उल्लेख वाचून विचारपूर्वक मतदान करावं.

तसेच तालुक्याच्या सर्वांगीण विकासाची दूरदृष्टी असलेला योग्य उमेदवार कोण याचाही विचार करून योग्य उमेदवाराला मतदान करावं तालुका विकासापासून वंचित राहणार नाही याचीही मतदान करताना काळजी घ्यावी असे आवाहन वसंतराव साळुंखे यांनी केले.