दौंड : कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगलीच्या 40 गावांबाबत विधान केल्यानंतर त्याचे पडसाद संपूर्ण राज्यात पहायला मिळाले होते. काल दौंड शहरातही मराठा महासंघाच्या वतीने आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलकांवर आज गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती दौंड पोलिसांनी दिली आहे.
दौंड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दौंड गोलराउंड कुरकुंभ ते दौंड रोडवर 4:35 ते 4:45 वाजण्याच्या सुमारास मराठा महासंघाच्या दौंड शहर व आजु बाजुच्या परीसरातील विक्रम पवार, शैलेंद्र दत्तात्रय पवार, दादा नांदखिले, अजिनाथ थोरात, रोहन घोरफडे, विकास जगदाळे (सर्व रा. दौंड ता. दौंड जि. पुणे) वगैरे व ईतर असे 5 ते 6 आंदोलकांनी एकत्र जमुन त्यांनी कुरकुंभ बाजुकडून येवून गोलराउंड येथे थांबलेल्या बस समोर येत ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ अशा घोशणा देवून एस. टी. बस चे समोरील काचेवर भगव्या रंगात ‘जय महाराष्ट्र’ असे लिहले व बाजुचे पोपटी रंगावर काळया रंगाने जाहीर निषेध असे लिहून बेकायदा जमाव जमवून सार्वजनिक मालमत्तेचे विद्रुपीकरण करून जमाव बंदी आदेषाचे उल्लंघन केले असल्याचे फिर्यादित म्हटले आहे.
याबाबत पांडुरंग एकनाथ थोरात (पोलीस हवालदार,दौंड पोलीस ठाणे) यांनी अंदोलकांविरूध्द भा.द.वि. कलम 143, 147, 34 सार्वजनिक मालमत्ता विद्रुपीकरण कायदा 1995 चे कलम 3 व महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 135 प्रमाणे फिर्याद दिली आहे.
दाखल अंमलदार पो हवा भागवत
तपासी अंमलदार पो हवा गायकवाड 317