पुणे : जळगावजिल्ह्यातील नामांकित “आदिलशाह फारुकी बहुउद्देशीय संस्थे”च्या वतीने महाराष्ट्र गौरव तसेच खान्देश भूषण पुरस्कार वितरण सोहळा दिनांक १३ नोव्हेंबर रविवार रोजी थाटामाटात पार पडला, केडगाव ता.दौंड येथील शिक्षिका शबनम डफेदार यांना यावेळी शैक्षणिक, सामाजिक आणि पर्यावरण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल ‘महाराष्ट्र गौरव’ हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
जळगाव येथील अल्पबचत भवनमध्ये या भव्यदिव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अब्दुल करीम सालार (जळगाव) हे होते. कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीत आणि त्यानंतर कुराण पठणाने करण्यात आली. यावेळी ऍड. जुबेर शेख (धुळे) यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेला 15 वा वार्षिक कार्यक्रम होता. ज्यामध्ये शबनम डफेदार यांना शैक्षणिक/सामाजिक/पर्यावरण/ क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्या बद्दल हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
कार्यक्रमात शिवश्री संजीव सोनवणे, ऍड.जुबेर शेख धुळे, अब्दुल करीम सालार, मुफ्ती हारून नदवी, फारूक शेख आदींनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रस्तावित फारूक पटेल अडावद यांनी सादर केले तर सूत्रसंचालन यशवंत निकवाडे यांनी केले. संस्था अध्यक्ष फारूक शाह नौमानी यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाला अब्दुल करीम सालार जळगाव, शिवश्री संजीव सोनवणे (चोपडा), ऍड.जुबेर शेख (धुळे), हकीम आर चौधरी (मुक्ताईनगर), अजमल शाह (जळगाव), फारूक शेख (जळगाव),अ. मजीद जकरिया (जळगाव), शबनम डफेदार (पुणे), लोकनियुक्त सरपंच भावना माळी (अडावद),उमेश कासट (अडावद), शब्बीर सर, कविता पाटील बोदवड, फारूक पटेल, पी आर माळी डॉ.नुरुद्दीन मुल्लाजी कासोदा आदी प्रमुख उपस्थित होते.