

|सहकारनामा|
दौंड : दौंड तालुक्यातील पाटस येथे महाराष्ट्र राज्य विद्युत कंपनी म्हणजेच महापारेषण या सरकारी कंपनीचे 3 टॉवर अज्ञात इसमांनी तोडून ते जमीनदोस्त केल्याची घटना घडली आहे.
यात मालमत्तेचे सुमारे 3 कोटी 50 लाख रूपयांचे नुकसान झाले आहे. याबाबत विठठल मारूती कांबळे (व्यवसाय नोकरी,वय ४५, रा.सध्या, गोपाळवाडी ता.दौंड) यांनी फिर्याद दिली आहे.
कांबळे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार दि.१२ सप्टेंबर ते दि.१३ सप्टेंबर च्या मध्य रात्री कोणीतरी अज्ञात इसमांनी पाटस ता.दौंड येथील जमीन गट नं.११४६ मध्ये महाराष्ट्र शासन, महापारेषण महाराष्ट्र राज्य विदयुत पारेषण कंपनीचे सरकारी 3 विद्युत टॉवर कशाच्यातरी सहाय्याने जमीनीपासून कट करून टॉवर खाली पाडून सरकारी मालमत्तेचे अंदाजे साडे तीन कोटी रूपयांचे नुकसान केले असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
याबाबत त्यांनी अज्ञात इसमाविरूध्द कायदेशिर फिर्याद दिली असून यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा अधिक तपास यवत पोलीस करत आहेत.











