Categories: सामाजिक

आजपासून केडगाव येथील ‘शंभू महादेव’ यात्रा आणि ‘पीर’ साहेबांच्या उरुसाला सुरुवात

अब्बास शेख

दौंड : दौंड तालुक्यातील नावाजलेल्या केडगाव आणि वाखारी या गावच्या यात्रेला दि. 18 एप्रिल 2022 म्हणजे आजपासून सुरुवात झाली आहे. तब्बल 3 वर्षांनी यात्रा भरविण्याचा योग येत असल्याने येथील नागरिकांमध्ये कमालीचा उत्साह पाहायला मिळत आहे.
आज दि. 18 रोजी सकाळी 7 वाजता केडगाव येथील शंभू महादेवाच्या मूर्तीला अभिषेक स्नान घालण्यात आले असून त्यानंतर सर्व देवतांना निशाणी व हार घालण्यात येणार आहेत. सकाळी 10 ते दुपारी 12 वाजेपर्यंत काल्याचे कीर्तन होणार असून दुपारी 12 नंतर काल्याचा महाप्रसाद कार्यक्रम होणार आहे. रात्री 9 वाजता ‘महादेव’ आणि ‘पीर’ साहेबांच्या छबीना पालखीची मिरवणूक आणि गलफ कार्यक्रम होणार आहे. मिरवणूकि नंतर केडगावमध्ये मनोरंजनासाठी लोकनाट्य तमाशा आयोजित करण्यात आला असून दुसऱ्या दिवशी हजेरी आणि सायंकाळी कुस्त्यांचा फड रंगणार आहे.
केडगाव/वाखारी येथील हजरत सय्यद शहामीर उर्फ शादावल बाबा यांच्या उरुसाला दि.18 एप्रिल रोजी सायंकाळी गलफच्या कार्यक्रमाने सुरुवात होत असून मंगळवार दि. 19 रोजी ‘पीर’ साहेबांच्या दर्ग्यासमोर इंगळाचा कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर नागरिकांच्या मनोरंजनासाठी लोक नाट्याचा कार्यक्रम होणार असून दुसऱ्यादिवशी सकाळी हजेरी आणि सायंकाळी कुस्त्यांचा जंगी कार्यक्रम होणार आहे.
महादेव यात्रा आणि पीर साहेबांच्या उरुसाच्या लगबगिने येथील रस्ते फुलले असून कोरोना संकटानंतर प्रथमच मोठ्या उत्साहात येथील यात्रा आणि उरुस संपन्न होत आहे.

Team Sahkarnama

Recent Posts

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार – मा.नगराध्यक्ष बादशाह शेख

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…

45 मि. ago

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

3 तास ago

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

23 तास ago

दौंडमध्ये चिमुकलींचा विनयभंग, 3 उंटवाल्यांना पोक्सो कायद्यान्वये अटक

दौंडमध्ये चिमुकलींचा विनयभंग, 3 उंटवाल्यांना पोक्सो कायद्यान्वये अटक

4 दिवस ago