Categories: राजकीय

परभणीतून महादेव जानकर यांना उमेदवारी जाहीर, जानकर यांना राष्ट्रवादीच्या कोट्यातून उमेदवारी – सुनिल तटकरे

परभणी : महादेव जानकर हे परभणीतून लढणार असल्याचे काहीवेळापूर्वी सुनिल तटकरे यांनी जाहीर केले आहे. त्यामुळे जानकर बारामतीमधून लढणार की परभणीतून यावर आता पडदा पडला आहे.

सुनिल तटकरे यांनी काहीवेळापूर्वी पत्रकार परिषद घेऊन जानकर हे परभणीतून लढणार असल्याचे सांगून माध्यमांमध्ये येणाऱ्या बातम्यांना पूर्णविराम दिला आहे. जानकर हे राष्ट्रवादी च्या कोट्यातून लढत असल्याचेही त्यांनी यावेळी जाहीर केले. त्यामुळे आता रायगड मधून सुनिल तटकरे, शिरूरमधून आढळराव पाटील आणि परभणीतून महादेव जानकर यांची उमेदवारी फायनल झाली आहे.

महायुतीने नाराजांची नाराजी दूर करण्यास सुरुवात केली असून कालपर्यंत महाविकास आघाडीकडून जानकर लढणार असे चित्र दिसत असताना ऐनवेळी महायुतीने त्यांचे जुने सहकारी महादेव जानकर यांना जवळकरून आपण महायुतीपेक्षा एक पाऊल पुढे असल्याचे दाखवून दिले आहे. तर इकडे पुरंदरचे माजी आमदार, मंत्री विजय शिवतारे यांची तलवार म्यान करण्यातही महायुतीला यश आले असून आपण अजित पवारांचा (महायुतीचा) उमेदवार भरघोस मतांनी निवडून आणू असे शिवतारे यांनी जाहीर केले आहे.

Team Sahkarnama

Recent Posts

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

12 तास ago

दौंडमध्ये चिमुकलींचा विनयभंग, 3 उंटवाल्यांना पोक्सो कायद्यान्वये अटक

दौंडमध्ये चिमुकलींचा विनयभंग, 3 उंटवाल्यांना पोक्सो कायद्यान्वये अटक

3 दिवस ago

पुणे ग्रामिण पोलिसांची दमदार कामगिरी | उरुळी कांचन गोळीबार प्रकरणातील आरोपिंना अटक, बंदुकीची 175 तर पिस्तूलाची 40 काडतुस हस्तगत

पुणे ग्रामिण पोलिसांची दमदार कामगिरी | उरुळी कांचन गोळीबार प्रकरणातील आरोपिंना अटक

4 दिवस ago

फक्त कर्ज द्या अण वसूल करा इतकेच सहकारी सोसायट्यांचे काम राहिले नाही, आता 151 प्रकारचे व्यवसाय सुरु करता येणार – सहकारमंत्री

फक्त कर्ज द्या अण वसूल करा इतकेच सहकारी सोसायट्यांचे काम राहिले नाही, आता 151 प्रकारचे…

4 दिवस ago