Categories: सामाजिक

दौंड मध्ये भगवान महावीर जयंती मोठ्या जल्लोषात साजरी, सकल जैन संघाच्यावतीने शोभा यात्रेचे आयोजन

अख्तर काझी

दौंड : दौंड शहरात जैन धर्मियांचे चोविसावे तीर्थंकर भगवान महावीर यांचा जन्म कल्याणक महोत्सव विविध धार्मिक कार्यक्रम व उपक्रमांनी हर्षोल्लासात साजरा करण्यात आला. परंपरेप्रमाणे तीन संप्रदायांनी एकत्र येत एकच भव्य मिरवणुकीचे व उपक्रमांचे संयोजन केले.

दौंड शहरातील रेल्वे उड्डाण पुलाजवळील श्री चंद्रप्रभू दिगंबर जैन मंदिरातून जन्म कल्याणक महोत्सवानिमित्त पालखी काढण्यात आली. दौंड – सिध्दटेक मार्गावरील श्री विमल – पार्श्वनाथ जैन मंदिरात स्नात्र पूजा करण्यात आली. श्री सकल जैन संघाच्या वतीने, संघपती शांतीलाल मुनोत, प्रेमसुख कटारिया, घिसुलाल जैन ,सुशील शहा यांच्या नेतृत्वाखाली आज भगवान महावीर यांच्या पंचधातूची मूर्ती व तैलचित्राची श्री विमल – पार्श्वनाथ जैन मंदिर येथून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. भगवान महावीर यांचा जयघोष करण्यासह विविध घोषणा देण्यात आल्या. हातात पंचरंगी ध्वज घेत युवक – युवती आणि महिला मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

आमदार राहुल कुल, माजी आमदार रमेश थोरात, नगराध्यक्ष इंद्रजीत जगदाळे यांच्यासह राजकीय व सामाजिक संघटनांच्या पदाधिकार्यांनी प्रतिमा पूजन करून मिरवणुकीचे स्वागत केले. शहराच्या प्रमुख मार्गांवरून मार्गक्रमण करीत श्री जैन स्थानक येथे सदर मिरवणूक विसर्जित करण्यात आली.भगवान महावीर यांच्या जन्मासंबंधी एका छोटी नाटिका व स्तवनचे सादरीकरण झाल्यानंतर मंगलपाठाने सांगता करण्यात आली.

जैन स्थानक येथे सकाळी प्रार्थना व स्वाध्याय करण्यात आले. श्री चंद्रप्रभू दिगंबर जैन मंदिर आणि श्री विमल – पार्श्वनाथ जैन मंदिरात विधिवत अभिषेक करून पूजा अर्चनेसह महाआरती करण्यात आली. जन्म कल्याणक निमित्त जैन बांधवांनी निरंकार उपवास, आयंबिल, एकासना, ब्यासना, आगम ग्रंथ वाचन, कंदमूळ त्याग, आदी जप – तप व दान करून भगवान महावीर यांची आराधना केली.

Team Sahkarnama

Recent Posts

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

12 तास ago

दौंडमध्ये चिमुकलींचा विनयभंग, 3 उंटवाल्यांना पोक्सो कायद्यान्वये अटक

दौंडमध्ये चिमुकलींचा विनयभंग, 3 उंटवाल्यांना पोक्सो कायद्यान्वये अटक

3 दिवस ago

पुणे ग्रामिण पोलिसांची दमदार कामगिरी | उरुळी कांचन गोळीबार प्रकरणातील आरोपिंना अटक, बंदुकीची 175 तर पिस्तूलाची 40 काडतुस हस्तगत

पुणे ग्रामिण पोलिसांची दमदार कामगिरी | उरुळी कांचन गोळीबार प्रकरणातील आरोपिंना अटक

4 दिवस ago

फक्त कर्ज द्या अण वसूल करा इतकेच सहकारी सोसायट्यांचे काम राहिले नाही, आता 151 प्रकारचे व्यवसाय सुरु करता येणार – सहकारमंत्री

फक्त कर्ज द्या अण वसूल करा इतकेच सहकारी सोसायट्यांचे काम राहिले नाही, आता 151 प्रकारचे…

4 दिवस ago