5 लाखांचा अपहार करून फरार झालेल्या आरोपीस अटक, लोणीकाळभोर पोलिसांची कामगिरी

लोणीकाळभोर : 5 लाख रुपयाचा अपहार करुन पाच महीन्यापासुन फरारी असणाऱ्या आरोपीस लोणीकाळभोर पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत निखील गुलाब कुंजीर (वय २९ वर्ष, धंदा – व्यवसाय, रा. कुंजीरवाडी पानमळा, रोड ता. हवेली, जिल्हा – पुणे) यांनी फिर्याद दिली होती.

फिर्यादीच्या ओळखीचा असणारा आरोपी अश्रफ अमजद सय्यद (वय २९ वर्ष, रा. वाघेशोरनगर, गोरेवस्ती वाघोली पुणे) यास फिर्यादी यांनी विश्वसाने पाच लाख रुपये हे पोपट भोलाजी ढवळे (रा. मगरपट्टा हडपसर पुणे) यांना देणेसाठी दिले असता आरोपी अश्रफ सय्यद याने फिर्यादीचा विश्वसघात करुन पाच लाख रुपये पोपट ढवळे यांना न देता सदर रक्कमेचा अपहार केला व फरार
झाला होता.

मा.अमिताभ गुप्ता (पोलीस आयुक्त, पुणे शहर,) मा. संदीप कर्णीक (पोलीस सह आयुक्त, पुणे शहर) यांनी फरारी आरोपीचा शोध घेणेबाबत वेळोवेळी क्राईम मिटींग मध्ये आदेशित केलेले होते. त्याबाबत राजेंद्र मोकाशी (वरीष्ठ पोलीस निरीक्षक लोणीकाळभोर) यांनी तपास पथकातील पोउपनि अमित गोरे व पोलीस अंमलदार यांना आदेशित केले असल्यामुळे सदर फरारी आरोपीचा शोध सुरु होता. हा शोध घेत असताना तपास पथकातील पोलीस अंमलदार पोलीस नाईक / देविकर, व पोशि / वीर यांना त्यांच्या बातमीदारामार्फत खात्रीशिर बातमी मिळाली की ५ लाख रुपायाचा अपहार करून पाच महीन्यापासुन स्वताःचे अस्तित्व व ओळख लपवुन फरार असलेला आरोपी अश्रप अमजद सय्यद हा वाघोली येथे येणार असल्याचे समजले. त्यानंतर पोलीस नाईक / देविकर यानी तांत्रिक विश्लेषणाव्दारे
तसेच पोलीस अंमलदार बाजीराव वीर, निखील पवार यांनी सदर ठिकाणी जाऊन सापळा रचला असता तेथे अश्रफ अमजद सय्यद आढळून आला. त्यानंतर पोलीस त्यास पकडण्यासाठी गेले असता त्याला पोलीसांची चाहुल लागल्याने तो तेथुन पळुन जावु लागला होता. मात्र पोलीसांनी त्याचा
पाठलाग करुन शिताफीने त्याला पकडले.

सदरची उल्लेखनीय कामगीरी मा. अमिताभ गुप्ता (पोलीस आयुक्त पुणे शहर) मा. संदीपकर्णीक (पोलीस सह आयुक्त पुणे शहर) मा. नामदेव चव्हाण (अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग पुणे शहर) मा. नम्रता पाटील, (पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ – ५) मा. बजरंग देसाई, (सहा. पोलीस
आयुक्त हडपसर विभाग) राजेंद्र मोकाशी, (वरीष्ठ पोलीस निरीक्षक) सुभाष काळे (पोलीस निरीक्षक, गुन्हे ) लोणीकाळभोर पोलीस स्टेशन यांचे मार्गदशनाखाली तपास पथकातील अधिकारी पोउपनि अमित गोरे,
यांचे सोबत पोना/संभाजी देविकर, अमित साळुंखे, पोलीस कॉन्स्टेबल बाजीराव वीर, शैलेष कुदळे, निखील पवार यांचे पथकाने केली आहे.