Lonand | पालखी सोहळ्यात लोणंद येथील अतिक्रमणांचा अडसर, एका दिवसात अतिक्रमण न काढल्यास होणार कारवाई

शौकत शेख

सोमेश्वर : लोणंद शहरातील रस्त्याच्या कडेला असणारी अतिक्रमणे काढण्याच्या व्यापाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. लोणंद शहरातील रस्त्याच्या कडेला असणारी अतिक्रमणे संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात अडसर ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे संबंधित अतिक्रमण धारक व्यक्तींना अतिक्रमण काढून घेण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.

दि. १८ जून रोजी श्री. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा लोणंदमध्ये येत आहे. त्यामुळे लोणंद शहरात रस्त्याच्या कडेला ज्या व्यापाऱ्यांची अतिक्रमणे आहेत. त्यांनी एका दिवसात त्वरित अतिक्रमणे काढावीत अशा सूचना देण्यात आल्या आहेत. श्री संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी लोणंद शहरात दोन दिवस मुक्कामी असते त्यामुळे राहदारीची कोंडी होऊ नये, पालखी सोहळा व्यवस्थित पार पडावा यासाठी हि अतिक्रमणे व्यापाऱ्यांनी स्व खर्चानी काढावी अश्या सूचना देण्यात आल्या आहेत.

एक दिवसात अतिक्रमण काढले नाही तर प्रशासनाकडून जे.सी.बी. च्या सहाय्याने ही अतिक्रमणे काढण्यात येतील अशा सूचना व्यापाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. त्यासाठी रस्त्यावर मार्किंग करून देण्यात आले यावेळी खंडाळा तहसीलदार, नॅशनल हायवे पुणे अधिकारी, पी.डब्लू.डी. अधिकारी उपस्थित होते.