Categories: सामाजिक

दौंड तालुक्यातील मळद येथे मोबाईल ‘लोक अदालतीचे’ आयोजन

सहकारनामा

दौंड : उच्च न्यायालय विधीसेवा समिती मुंबई यांनी निर्देशीत केल्यावरून सोमवार (दि २०) रोजी मळद (ता. दौड ) येथे  मोबाईल लोकअदालतीचे आयोजन करण्यात आलेले आहे. या लोकन्यायालयात तडजोड होण्याजोगी फौजदारी प्रकरणे, दिवाणी दावे, ग्रामपंचायत यांचेकडील दाखलपूर्व प्रकरणे ठेवण्यात येणार आहेत.

तसेच मंगळवारी (दि २१) रोजी सकाळी ९ वाजता फिरंगाई माता हायस्कूल, कुरकुंभ येथे कायदेविषयक शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे. या लोकअदालत व विधी साक्षरता शिबीरासाठी निवृत्त जिल्हा न्यायाधीश डी. डी. कांबळे, हे प्रमुख पॅनल जज म्हणून काम पाहणार आहेत.

तरी मळद, कुरकुंभ व लगतच्या गावातील पक्षकार व ग्रामस्थांनी याची नोंद घ्यावी व सदर मोबाईल लोक अदालतीमध्ये व कायदेविषयक शिबीरामध्ये जास्तीत जास्त नागरिकांनी सहभाग घ्यावा असे आवाहन दौंड येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश  जे. बी. गोयल यांनी केले आहे.

Team Sahkarnama

Recent Posts

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

13 तास ago

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार – मा.नगराध्यक्ष बादशाह शेख

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…

15 तास ago

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

17 तास ago

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

2 दिवस ago