Lockdown : राज्य शासनाच्या लॉकडाऊन निर्णया विरोधात दौंडमध्ये व्यापाऱ्यांचे आंदोलन



– सहकारनामा

दौंड : पुणे शहर व पुणे जिल्हा ग्रामीण भागामध्ये दि.30 एप्रिल पर्यंत अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतलेला आहे. शासनाच्या या निर्णया विरोधात दौंड शहरातील व्यापाऱ्यांनी आज आंदोलन केले आहे. 

येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये दौंड मर्चंट असो. व दौंड व्यापारी महासंघातील व्यापाऱ्यांनी एकत्र येत लॉक डाऊन विरोधात आंदोलन केले आहे. लॉकडाऊन चा निर्णय राज्य शासनाने त्वरित रद्द करावा अशी मागणी यावेळी उपस्थित व्यापाऱ्यांनी केली आहे. 

या लॉकडाऊन मुळे व्यापारी, हॉटेल व्यावसायिक तसेच हातावर पोट असणाऱ्यांचे प्रचंड आर्थिक नुकसान होणार आहे. मागील वर्षीच्या लॉक डाउन मुळे व्यापाऱ्यांची विस्कटलेली आर्थिक घडी आता कोठे नीट बसत असताना पुन्हा लॉक डाउन केल्याने व्यवसायच बंद करण्याची अनेकांवर वेळ येणार आहे. 

त्यामुळे शासनाने संपूर्ण लॉक डाऊन ऐवजी मिनी लॉक डाऊन लागू करावा व व्यापाऱ्यांचा व्यवसाय व ज्यांचे हातावर पोट आहेत अशांचे संसार वाचवावेत अशी मागणी व्यापारी वर्गाने केली आहे. व्यापारी संघाचे अध्यक्ष राजेश पाटील, राजेंद्र ओझा व बहुसंख्येने व्यापारी यावेळी उपस्थित होते.