Lockdown – अण.. काही मिनिटांत केडगाव झाले बंद, रस्त्यावर शुकशुकाट



– सहकारनामा

दौंड : 

दौंड तालुक्यातील केडगाव हि मोठी बाजारपेठ आहे. येथे कायमच नागरिकांची रेलचेल असते. मिनी लॉकडाउन झाल्यानंतरही केडगाव बाजारपेठेत हवा तसा फरक पडत नव्हता मात्र आज 6 एप्रिल रोजी सुधारित आदेश आल्यानंतर मात्र पोलीस यंत्रणाही सक्रिय झाली आणि काही मिनिटांमध्ये गजबजलेला केडगाव स्टेशन परिसर सामसूम झाला.

नागरिकांना वेळोवेळी सूचना करूनही नागरिक या सूचनांचे पालन करताना दिसत नव्हते मात्र आज केडगाव पोलीस चौकीचे पोलीस उपनिरीक्षक गंपले, पोलीस हवालदार जगताप, पोना करे, पोना दराडे व इतर पोलीस स्टाफने केडगावमध्ये संचलन करत जमावबंदी आदेशाची कडक अंमलबजावणी करताच केडगाव बाजारपेठेतील अत्यावश्यक सुविधा असणारी दुकाने वगळता सर्व दुकाने बंद झाली आहेत.