Lockdown – अखेर राज्य सरकारकडून ‛कडक निर्बंध’ असलेली नवीन नियमावली जाहीर, अशी आहे नवीन नियमावली



| सहकारनामा |

मुंबई : महाराष्ट्र राज्यामध्ये सध्या कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातला आहे. विविध उपाययोजना करूनही हि साथ आटोक्यात येत नसल्याने अखेर राज्य सरकारने कडक नियमावली जाहीर केली आहे.

या नियमावली नुसार आता दैनंदिन गरजा भागावणारी अत्यावश्यक दुकाने जसे किराणा दुकान, भाजीपाला, बेकरी, फळविक्रीची दुकाने, मासे, चिकन-मटणची विक्री होत असलेली दुकाने सकाळी सात ते अकरा वाजेपर्यंतच चालू राहणार आहेत. या वेळेनंतर शासनाच्या नियमानुसार सर्वच उघडलेली दुकाने बंद ठेवावी लागणार आहे.  हे सर्व नियम पाळत असताना मात्र या मालांची होम डिलिव्हरी हि रात्री आठ वाजेपर्यंत सुरू राहणार आहे.



होम डिलिव्हरीच्या सुविधेमुळे ग्राहकांनी त्यांना लागणारे किराणा सामान हे रात्री आठ वाजेपर्यंत दुकानातून आपल्या घरी मागवू शकणार आहेत. या कडक निर्बंधांमध्ये सरकारमान्य रेशनिंगच्या दुकानांचाही समावेश असून त्यांनाही सकाळी सात ते अकरा वाजेपर्यंतची वेळ देण्यात आली आहे.

●【 हे सकाळी 7 ते 11 पर्यंत सुरू राहणार 】

★ किराणा दुकान, 

★ भाजीपाला, फळविक्री, 

★ दूध विक्री दुकान (डेअरी), 

★ चिकन, मटण, मासे विक्री, 

★ खासगी वाहनांसाठी पेट्रोल पंप, 

★ कृषी संबंधित सेवा, 

★ पशुखाद्याची विक्री करणारी दुकानं सकाळी सात ते अकरा यावेळेत खुली राहणार आहेत.




●【 मात्र या नव्या नियमावलीत हे बंद राहील 】

★धार्मिक स्थळे, 

★ आठवडी बाजार, 

★ दारुची दुकानं, 

★ सर्व खासगी कार्यालये, 

★ सलून, ब्यूटी पार्लर, 

★ चहाची टपरी, 

★स्टेडियम, मैदाने, 

★ सिनेमागृह, नाट्यगृह, 

★कोचिंग क्लासेस 

हे पूर्णत: बंद राहणार आहेत.