Lockdown : आता लॉकडाउन शिवाय पर्याय नाही : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, भाजपचा संपूर्ण लॉकडाउन ला विरोध : देवेंद्र फडणवीस



– सहकारनामा

मुंबई : 

आज दि.10 एप्रिल रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली असून या बैठकीत महाराष्ट्राच्या लॉकडाऊनसंदर्भात मोठी चर्चा होत असून याच बैठकीत लॉकडाउनवर निर्णय घेतला जाउ शकतो.

मुख्यमंत्र्यांनी बोलताना लॉकडाऊन करायची वेळ आली आहे कारण लॉकडाउन केला नाही तर कोरोना विरोधात लढणाऱ्या यंत्रणांवर मोठा ताण येऊन त्यांचे खच्चीकरण होईल त्यामुळे निर्णय घेण्याची वेळ आली आहे, तसेच राज्यात लॉकडाऊन करणे हा एकमेव मार्ग नसला तरी जगात तो स्वीकारला आहे, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपले म्हणणे मांडले आहे.

 लॉकडाउन केले तर महिन्याभरात परिस्थिती नियंत्रनात आणू  पण त्यासाठी सर्वांची याला साथ हवी आणि सर्वांनी एक मुखाने निर्णय घेण्याची गरज आहे असे मुख्यमंत्र्यांनी पुढे म्हटले आहे.

मुख्यमंत्र्यांनी आपल्या  सध्या कोरोनाची साखळी तोडणं आणि आरोग्य सुविधा वाढवणं गरजेचं आहे. 

तर लॉकडाउन च्या निर्णयावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विरोध केला असून निर्बंध असायला हवेत, पण जनतेची अडचण आणि त्यांचा उद्रेक लक्षात घेतला पाहिजे असं ते म्हणालेत. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली असून या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. पूर्ण लॉकडाऊन केला तर जनतेचा उद्रेक होईल असा इशाराही देवेंद्र फडणवीसांनी दिला आहे.