पुणे : सहकारनामा
संपूर्ण महाराष्ट्र राज्य हे कोरोनामुळे पुन्हा एकदा लॉकडाउन च्या उंबरठ्यावर येऊन उभे राहिले आहे. वाढत्या कोरोना रुग्णांनामुळे प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे.
याच संदर्भात राज्याचे मुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार यांची काही वेळापूर्वीच पुण्यात बैठक पार पडली.
या बैठकीमध्ये पुणे जिल्ह्यात तूर्तास लॉकडाऊन होणार नाही, मात्र कडक निर्बंध लावण्यात येणार असल्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती समोर आली आहे.
पुणे शहर आणि जिल्ह्यात लॉकडाऊन होऊ नये, अशी मागणी लोकप्रतिनिधी आणि व्यापारीवर्ग करत होता त्यामुळे शहरात तूर्तास तरी लॉकडाऊन करण्यात येणार नसला तरी कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर कडक निर्बंध लागी करण्यात येणार आहेत अशी भूमिका अजित पवार यांनी या बैठकीत घेतल्याचे समोर येत आहे.