पुणे : सहकारनामा ऑनलाईन
पुणे शहरासह पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच चालला आहे. त्यामुळे आता याला पायबंद घालणे गरजेचे बनले आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी सोमवार दि.13 जुलै पासून पुणे, पिंपरी चिंचवडसह 23 गावांमध्ये 10 दिवसांसाठी कडक लॉकडाऊन lockdown in Pune करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. यामध्ये पुणे शहराला लागून असलेल्या विविध गावांचा समावेश करण्यात आला आहे.
शहरालगत असणाऱ्या आणि लॉकडाउनमध्ये समावेश असणाऱ्या तालुक्यांमध्ये हवेलीच्या 18 आणि मुळशीच्या 5 गावांचा समावेश आहे.
हवेली तालुक्यामध्ये असणाऱ्या ग्रामपंचायतींपैकी केसनंद, वाघोली, मांजरी खुर्द, आव्हाळवाडी,लोणी काळभोर, कदमवाकवस्ती, ऊरुळीकांचन, कुंजीरवाडी, औताडे, हांडेवाडी, वडकी, नांदेड, किरकिटवाडी, खडकवासला, गोऱ्हे बुद्रूक, गोऱ्हे खुर्द, डोणजे, खानापूर या गावांचा समावेश आहे तर मुळशी तालुक्यातील भुगाव, नांदे, पिरंगुट, भूकूम, घोटावडे आदी गावांचा समावेश करण्यात आला आहे.