Lockdown – पुणे जिल्ह्यातील ‛या’ 42 गावांमध्ये होणार संपूर्ण लॉकडाउन! पहा आपला तालुका, आपले गाव तर या यादीत नाही ना

 



|सहकारनामा|

पुणे : मागील दिड वर्षांपासून राज्यात कोरोनाने थैमान घातल्यानंतर कोरोना रुग्ण वाढीला ब्रेक लागून कोरोना बधितांचा आकडा कमी होत असल्याने लॉकडाउन (Lockdown) उठेल याच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. 

परंतु पुणे जिल्ह्यात हॉटस्पॉट ठरलेल्या बाधित गावांची संख्या कमी होण्याऐवजी पुन्हा वाढत असल्याने आता चिंता वाढल्या आहेत. ग्रामिण भागामध्ये कोरोना पॉझिटिव्ह लोकांचा आकडा वाढतच असल्याने निर्बंध उठवण्यास प्रशासनाला अडचणी येत आहेत.

पुणे जिल्ह्यातील 42 गावे हि पुन्हा हॉटस्पॉट ठरत असून या गावांमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याने या गावांमध्ये संपूर्ण लॉकडाऊन लावण्यात यावा तसेच घरो घरी जाऊन सर्वेक्षण करण्यात यावे अशा सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी गटविकास अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता जिल्हा परिषदेकडून ग्रामीण भागाचा रुग्णबधितांचा दर आणि हॉटस्पॉट गावांची संख्या आटोक्यात आणण्यासाठी आता विशेष सर्वेक्षण मोहीम राबविण्यात येत आहे. 

पुणे जिल्ह्यात मागील 25 दिवसांत कोरोना बाबत हॉटस्पॉट ठरलेल्या गावांची संख्या ही कमी होण्याऐवजी वाढत असून  मागील आठ दिवसांपूर्वी हॉटस्पॉट गावे ही शंभर पेक्षा कमी होती मात्र, आता हा आकडा 109 च्या पुढे गेला आहे. त्यातच ग्रामीण भागामध्ये कोरोना बाधित होण्याचा दर हा अजूनही 5 च्या खाली आलेला नाही त्यामुळे कोरोना हॉटस्पॉट ठरलेल्या गावातील ग्रामसेवक, गटविकास अधिकारी तसेच ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर यांच्यासोबत मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी सोमवारी बैठक घेतली असून या बैठकीत त्यांनी लॉकडाउन बाबत वरील सूचना केल्या असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.

शहरी भागाच्या तुलनेत ग्रामिण भागात अजूनही कोरोना बधितांचा आकडा जास्त आहे. पुणे जिल्ह्यातील 10 तालुक्यांमधील 42 गावांत रुग्ण वाढत असून  ही रुग्णवाढ कशी थांबवता येईल या दृष्टीने ही महत्वपूर्ण बैठक घेण्यात आली होती.

या बैठकीमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव होत असलेल्या गावांमध्ये रूग्णवाढ रोखण्यासाठी संपूर्ण लॉकडाऊन करण्यात यावे आणि गावात धडक सर्वेक्षण मोहीम राबवून अॅटीजन आणि आरटीपीसीआर चाचण्या करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. कोरोना बाधित संशयितांना थेट कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करण्याच्याही सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी दिल्या आहेत.

यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी माहिती देताना घरोघरी जाऊन  सुरू करण्यात आलेल्या विशेष धडक सर्वेक्षण मोहिमेमुळे   हॉटस्पॉट गावात असलेले रुग्ण माेठ्या प्रमाणात दिसून येत आहेत. यामुळे उपाययोजना करण्यात मदत होत असून हॉटस्पाॅट गावांची संख्या कमी करण्याचे आमचे उद्दिष्ट असून कोरोना वाढ रोखण्यात या सर्वेक्षणाचा चांगला फायदा होत असून ज्या गावांत रुग्ण वाढ होत आहे त्या गावांत पूर्ण लॉकडाऊन करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

रुग्ण वाढ होत असलेले  10 तालुके आणि त्यांची 42 गावे..

पुणे जिल्ह्यातील आंबेगाव, बारामती, दौंड, हवेली, इंदापूर, जुन्नर, खेड, मावळ, मुळशी, शिरूर हे रुग्ण वाढ होणारे तालुके असून तालुका आणि त्यातील गावे पुढील प्रमाणे आहेत..  

आंबेगाव : जारकरवाडी, जवळे, वळती,

बारामती : चाैधरवाडी, मोरगाव

दौंड : बेटवडी, देऊळगाव गाडा, देऊळगाव राजे, केडगाव, लिंगाळी, वरवंड

हवेली : नऱ्हे

इंदापुर : बावडा, हागरवाडी, कळंब, माळवडी, शेटफळगडे

जुन्नर : अळू, बोरी सालवडी (बोरी खुर्द), धोलवड, डिंगोरे, जलवंडी, मालवडी, पादीरवाडी, पिंपरी पेंढार, पूर, शिरोली तर्फे कुंकंदनेर.

खेड : बिराडवाडी, खरपूड, कोयाळी

मावळ : भाजे, काल्हाट, सालुंब्रे, टाकवे खेर

मुळशी : म्हारूंजी, सुस,

शिरूर : कवठे, केंदूर, कोरेगाव भीमा, पाबळ, सादलगाव, सविंदने