Lockdown आजपासून पुणे कडकडीत ‛बंद’, फक्त याच गोष्टींना परवानगी



पुणे : सहकारनामा ऑनलाईन

आज सोमवारपासून 23 जुलै पर्यंत पुण्यात Lockdown लॉकडाऊन सुरू झाला आहे. लॉकडाउनच्या सुरुवातीला कडक पद्धतीने लॉकडाऊनची अंमलबजावणी सुरू राहणार आहे.याबाबतचे आदेश नवनियुक्त आयुक्त विक्रम कुमार यांनी जाहीर केले आहेत.

या आदेशानुसार पुण्यातील मेडिकल, दवाखाने, बँका, हे फक्त सुरू राहणार असून केवळ अत्यावश्यक वाहनांसाठी सकाळी नऊ ते दुपारी दोन वाजेपर्यंत पेट्रोल पंप सुरू राहणार आहेत. या बरोबरच पाणीपुरवठा करणारे टँकर, वर्तमानपत्रे, गॅस सेवा सुरू राहणार आहे. मात्र यामध्ये दाढी, कटिंगची दुकाने, ब्युटी पार्लर, स्पा हे पूर्णपणे बंद असणार आहेत. सर्व किराणा दुकान, सर्व किरकोळ आणि ठोक विक्रेते, सर्व इतर व्यवसाय करणारे व्यापारी दुकाने दिनांक 14 जुलै ते दिनांक 18 जुलै पर्यंत संपूर्णतः बंद राहतील. त्यानंतर दिनांक 19 जुलै ते 23 जुलै या कालावधीत सकाळी 8 ते दुपारी 12 वाजेपर्यंत केवळ अत्यावश्यक वस्तूंचा पुरवठा करणारी दुकाने आणि त्यांचे ठोक विक्रेते यांची दुकाने सुरू राहणार आहेत.

लॉकडाऊनच्या काळात विनाकारण फिरत असणारी दुचाकी, चारचाकी वाहने जप्त करण्यात येईल असा दिला गेला इशाराही आहे. शिवाय त्याची कागदपत्रे जप्त करून सदर व्यक्तींवर साथरोग नियंत्रण कायद्यातील कारवाई करण्यात येणार आहे.

ऑनलाईन खाद्य पदार्थ, सार्वजनिक, खाजगी क्रीडांगणे, मॉर्निंग वॉक, एव्हीनिंग वॉक, उद्याने, उपहारगृह, बार, लॉज, हॉटेल्स, रिसॉर्ट, मॉल, सर्व भाजी विक्रीचे मार्केट, फळे विक्रेते, चिकन, मटण, अंडी, मासे आदी दुकाने दिनांक १४ जुलै ते १९ जुलै पर्यंत बंद राहणार आहेत. तसेच शाळा, महाविद्यालय, बंद राहणार असून अत्यावश्यक सेवेतील वाहने, पूर्व परवानगी प्राप्त वाहने, विमानतळ, रेल्वे स्टेशन येथे जाणे – येणे करिता, वैद्यकीय कारणास्तव प्रवासासाठी खाजगी वाहनांचा वापर करता येणार आहे. या क्षेत्रातील पुणे मनपा सर्व ६५ वर्षांपुढील वयोवृद्ध  व्यक्ती, मधुमेह, उच्चरक्तदाब, दमा, यकृत व मूत्रपिंडाचे आजार, व विविध गंभीर आजार असणाऱ्या व्यक्ती, गरोदर महिला, 10 वर्षांपेक्षा कमी वयोगटातील मुले यांना अत्यावश्यक सेवा व वैद्यकीय कारणाशिवाय घराबाहेर पडता येणार नसल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले आहे.