Lockdown! – राज्यात लॉकडाउन होणार का? आरोग्यमंत्र्यांनी दिली हि महत्वाची माहिती



पुणे : सहकारनामा

संपूर्ण राज्यामध्ये करोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असून त्यासोबत कोरोना बाधित रुग्णांची संख्याही वाढत असल्याने लॉकडाऊन होण्याची चर्चा देखील सुरू झाली आहे. 

याला पुष्टी म्हणून नुकतीच जी रात्री 8 ते सकाळी 7 अशी  जमावबंदी करण्यात आली आहे त्यामुळे आता लॉकडाउन होणार याबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत. सध्या उद्योगपती आणि महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेसही लॉकडाउन च्या बाजूने दिसत नाही.

राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी या विषयावर पत्रकारांशी बोलताना लॉकडाउन बाबत एक सूचक वक्तव्य केलं असून राज्यात कोरोना बाधितांची मोठ्या प्रमाणावर वाढती रुग्ण संख्या हे आव्हान असून ही परिस्थिती कशी हाताळावी हा पेच आमच्यापुढे आहे. अशा वेळी रुग्णवाढीचे प्रमाण आणि त्या तुलनेत आरोग्य सुविधा, औषधे या सगळ्याचं मोजमाप करणं आवश्यक असतं. रुग्णांच्या तुलनेत सुविधांचा अभ्यास करत राहावं लागतं. लॉकडाऊन हा कुणालाच मान्य होण्यासारखा नाही. तो कोणालाही आवडत नाही. पण परिस्थितीनुसार निर्णय घ्यावा लागतो. त्यामुळे ज्यावेळी तहान लागेल त्यावेळी विहीर खनायला सुरवात करणे हे करोनाच्या बाबतीत आपण करू शकत नाही. त्याची तयारी आधीच करावी लागणार आहे असं आरोग्यमंत्री टोपे यांनी सांगून सूचक इशारा दिला आहे.

टोपे यांच्या मते जर लोकांनी उपाययोजना अंमलात आणल्या नाही आणि कोरोना रुग्णांची संख्या अशीच वाढत राहिली तर मात्र सरकारचा नाईलाज होणार आहे आणि लॉकडाउन अटळ होऊन बसणार आहे.