Lockdown : अखेर निर्णय झाला… उद्यापासून राज्यात 15 दिवसांचा कडक ‛लॉकडाउन’, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ‛घोषणा’



– सहकारनामा

मुंबई : 

राज्यात मोठ्या प्रमाणावर कोरोना रुग्ण सापडत असल्याने आता राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कडक ‛लॉकडाउन’ची घोषणा केली आहे. हा लॉकडाउन 15  दिवसांचा असेल अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे. निर्बंध आणि सूट एकावेळी शक्य नाही असे म्हणत त्यांनी थोडी कळ सोसावी लागेल असे त्यांनी सर्व पक्षीय बैठकीत त्यांनी म्हटले होते.

या लॉकडाउन मध्ये 15 दिवसांची संचारबंदी असणार आहे. यात पब्लिक ट्रान्सपोर्ट चालू राहणार असून यात दवाखाने, मेडिकल, पाळीव प्राण्यांचे मेडिकल, दवाखाने चालू राहतील, सेबी कार्यालय, दूरसंचार कार्यालये, अधिस्वीकृती धारक पत्रकार, अत्यवश्यक सेवा सोडून सर्व बंद राहणार आहे.

या लॉकडाउन ला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर यांनी मात्र कडाडून विरोध केला होता. लॉकडाउन मुळे लोकांचा उद्रेक होईल आणि सर्वसामान्य जनतेचे मोठे हाल होतील असे म्हणत विरोधी पक्षनेत्यांनी या लॉकडाउन ला विरोध केला होता. तर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मुख्यमंत्री जो निर्णय घेतील तो मान्य असेल असे संगितले होते.

याबाबत काँग्रेसचे अशोक चव्हाण, नाना पटोले यांनीही आपापली मते मांडली होती. यात काँग्रेच्या नेत्यांकडून लॉकडाउन बाबत परस्परविरोधी मते आली.

लॉकडाउन बाबत कोणता निर्णय घ्यावा यासाठी तीन दिवसांपूर्वी सर्व पक्षीय बैठक आयोजित केली गेली होती. या बैठकीला राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर, भाजप चे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, एकनाथ शिंदे, बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, नाना पटोले हे उपस्थित होते. मात्र मनसेचे राज ठाकरे मात्र या बैठकीला उपस्थित राहिले नाहीत.