मुंबई : सहकारनामा
महाराष्ट्रामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून रुग्णसंख्याही झपाट्याने वाढत आहे. हि सर्व परिस्थिती पाहता राज्यात लॉकडाऊन होईल की नाही याबाबत सध्या जोरदार चर्चा होताना दिसत असून आम्ही त्वरित लॉकडाऊन करणार नसलो तरी मात्र सध्या यंत्रणेशी केली जाणारी चर्चा हि लॉकडाऊनच्या दिशेने जात असल्याचे टोपे यांनी म्हटले आहे. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची टास्क फोर्स आणि आरोग्य यंत्रणेसोबत सर्व यंत्रणेशी वार्तालाप सुरु असून मुख्यमंत्री महोदय याबाबत अंतिम निर्णय घेतील अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
लॉकडाउन बाबत त्यांनी बोलताना लॉकडाऊनचे चांगले आणि वाईट असे परीणाम होत असले तरी जीव जाण्यापेक्षा जीव वाचवा यासाठी लॉकडाऊन हा शेवटचा पर्याय असणार आहे. त्यामुळे राज्यात लोकडाऊन करण्याचा मानस नसला तरी सध्या निर्बंध कडक करण्यावर राज्यसरकारचा भर असून लॉकडाऊन लावण्यासाठी तयारीही करून ठेवावीच लागते असे म्हणत सरकारने लॉकडाऊनची तयारीही सुरु केल्याची माहिती टोपे यांनी दिली आहे.
लसीकरणाबाबत बोलताना त्यांनी राज्यातील ४५ वर्षांवरील सर्व नागरीकांनी कोरोना लसीकरण करून घेणे गरजेचे असून दिवसभर मास्क वापरुन योग्य अंतर (सोशल डिस्टनसींग) पाळलं तर कोरोनापासून निश्चित बचाव होईल आणि लॉकडाऊन लावण्याचा प्रश्नच येणार नाही असे आवर्जून नागरिकांना आवाहन करताना त्यांनी नमूद केले आहे.