स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ‘लीला पुनावाला फौंडेशन’च्या वतीने ‘टुमारो – टुगेदर’ प्रकल्पा अंतर्गत शालेय विद्यार्थिनींना ‘शिष्यवृत्ती’ वाटप

पुणे : रिता शेटीया

‘लिडींग इंडियन लेडीज अहेड’ हे ब्रीद वाक्य घेऊन मुलींच्या शिक्षणासाठी केवळ आर्थिक मदत च नव्हे तर भावी पिढीतील विद्यार्थिनीच्या व्यक्ती महत्त्व विकासावर कार्य करणाऱ्या लीला पूनावाला फाउंडेशन ने आज पर्यंत १४००० पेक्षा जास्त मुलींना शिक्षणासाठी सहाय्य केले आहे.

‘टुमारो – टुगेदर’ प्रकल्पा अंतर्गत दत्तक घेतलेल्या शाळेतील विद्यार्थिनींना शिष्यवृत्तीचे वाटप कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री अभिनव कुंभार (आयकर आयुक्त, पुणे विभाग),श्री अमित तलरेजा (चीफ फायनान्स ऑफिसर, ब्रोस इंडिया ऑटोमोटीव्ह लिमिटेड) यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी फाऊंडेशन च्या संस्थपिका लिला पूनावाला, विश्वस्त संस्थापक फिरोझ पूनावाला आणि फाऊंडेशन च्या बोर्ड ऑफ ट्रस्टी विनिता देशमुख आणि सी ई ओ प्रीती खरे, स्कूल कमिटी सदस्य, शुभचिंतक आणि पालक वर्ग मुलींना प्रोत्साहन आणि मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित होते.

यावेळी ‘टुमारो टुगेदर’ या अंकाच्या ९ व्या अंकाचे प्रकाशन करण्यात आले प्रमुख पाहुणे आणि संपादकीय टीम च्या हस्ते करण्यात आले. या अंकात फाउंडेशन च्या शिष्यवृत्ती मुळे मुलींना झालेले फायदे, विविध क्षेत्रात कामावर रुजू झालेल्या लीला ज्युनिअर चा आढावा देण्यात आला आहे.

यावेळी १० वी आणि बारावीत ९० टक्के पेक्षा जास्त गुण संपादित केलेल्या, दत्तक घेतलेल्या शाळेतील लीला ज्युनिअरस चा सत्कार प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आला. त्यांना लेखणी स्वरूपातील ट्रॉफी आणि स्मार्ट वॉच देण्यात आले.

यावेळी श्री अभिनव कुंभार (आयकर आयुक्त, पुणे विभाग) म्हणाले, लीला आणि फिरोझ पूनावाला म्हणजे देवाचे दोन हात आहेत , जे समाजासाठी खूप मोठे कार्य करत आहेत.

श्री अमित तलरेजा (चीफ फायनान्स ऑफिसर, ब्रोस इंडिया ऑटोमोटीव्ह लिमिटेड) म्हणाले, आम्हाला फाउंडेशन च्या या कार्यात सहभागी होता आले हे खूप महत्त्वाचे आहे . असेच कार्य पुढे करत राहू.

पद्मश्री लीला पुनावाला म्हणाल्या, की पालकांनी मुलींकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे मुलींना शिकवण्यासाठी पालकानी सहकार्य करणे अपेक्षित आहे. मुलींनी देखील खूप अभ्यास करून उच्च ध्येय साध्य करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. मुलींसाठी शिष्यवृत्ती बरोबर अनेक मार्गदर्शक उपक्रमात सहभागी व्हावे व गणित, इंग्रजी ,विज्ञान आणि करिअर मार्गदर्शन याचा पालकांनी व मुलींनी फायदा घ्यावा. भविष्यात आपण आपल्या शैक्षणिक जीवनात मेहनत करून मोठ्या हुद्द्यावर नोकरी व्यवसाय करावा हिच अपेक्षा पालकांच्या प्रमाणे आमची देखील आहे.

आपल्या मार्गदर्शनात फिरोज पुनावाला यांनी फौंडेशनच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली.