एन्काउंटर स्पेशालिस्ट पोलीस अधिकारी प्रदीप शर्माला जन्मठेप

मुंबई : मुंबई हायकोर्टाने एन्काउंटर स्पेशालिस्ट तथा माजी पोलिस अधिकारी  प्रदीप शर्मा याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली असून त्याची करण्यात आलेली निर्दोष मुक्तता रद्द करण्यात आली आहे. कोर्टाने 2006 च्या लाखनभैया बनावट चकमक प्रकरणात त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.

नोव्हेंबर महिन्यात 2006 साली झालेल्या  लाखनभैया एन्काउंटर बनावट चकमक प्रकरणात 12 आरोपींना ट्रायल कोर्टाने शिक्षा ठोठावली होती. ट्रायल कोर्टाने दोषी ठरवलेल्या 12 अन्य आरोपींसह आता प्रदीप शर्मावरही गदा आली आहे.

हायकोर्टाने प्रदीप शर्माची झालेली निर्दोष मुक्तता रद्द केली आहे. एन्काउंटर पुराव्याच्या आणि मालिकेच्या आधारे त्याला आता दोषी ठरविण्यात आले आहे. त्यामुळे हायकोर्टाकडून दोषी ठरविण्यात आलेल्या आरोपींची संख्या 13 झाली आहे. प्रदीप शर्मा याचे नाव जन्मठेपेच्या आरोपिंमध्ये आल्याने खळबळ माजली आहे. प्रदीप शर्मा हा मनसुख हिरेन हत्या प्रकरण आणि अँटीलिया स्फ़ोटक प्रकरणातीलही आरोपी आहे.