दौंड | काल खासदार संजय राऊत यांची वरवंड येथे सभा झाली. या सभेमध्ये राऊत यांनी भीमा पाटस कारखान्याच्या चेअरमन, संचालक यांच्यावर आरोप केले होते. त्यास आज आमदार तथा भीमा पाटस चे चेअरमन राहूल कुल यांनी पत्रकार परिषद घेऊन उत्तर दिले आहे.
कुल यांनी बोलताना, कालची सभा ही निमित्त होती, पुढे बाजार समितीची निवडणूक डोळ्यसमोर ठेऊन कालची सभा घेण्यात आली होती. संजय राऊत यांना कारखाण्याबाबतची सत्य परिस्थिती माहित नाही. 2002 ला सभासदांनी अध्यक्ष म्हणून निवडून दिलं ते आजपर्यंत. संजय राऊत यांचे आरोप हे अर्धवट माहितीच्या आधारे आहेत आणि जर चौकशी करायची आहे तर ती 1992 पासून करावी. आणि याची पूर्ण चौकशीची मागणी राऊत यांनी करायला हवी.
1992 नंतर 52 कोटी व नंतर 7 कोटी कर्ज घेतलं होतं पण हे एवढं कर्ज कशासाठी घेतलं आणि कुठे पैसे वापरले हे अजून समजत नाही.
मनी लॉंड्रिंगबाबत बोलताना त्यांनी साखर कारखानदारीत मनी लॉंड्रिंग होऊ शकत नाही. कारखाने चालवणे अवघड होते त्यावेळी मोदी, अमित शहा यांनी चांगले निर्णय घेतले त्यामुळे कारखानदारी वाचवली आहे. त्यामुळे राऊत यांनी सभासदांना भेटले असते तर त्यांना सत्य परिस्थिती समोर आली असती. कारखान्यात सर्व सुरळीत असताना यात विघ्न आणणे योग्य नाही. देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या 36 कोटी चा संपूर्ण हिशोब आहे तो त्यांना सहज उपलब्ध होऊ शकतो.
मी समितीचा हक्कभंग अध्यक्ष झाल्यानंतर राऊत यांचे बेछुट आरोप सुरु झाले. मला कुणी चेअरमन केलं हे तालुक्याला माहित आहे. तालुक्याच्या बाहेरच्यांनी आम्हाला सांगू नये आम्ही काय आहोत, आम्ही काय आहोत हे तालुक्याला माहित आहे त्यामुळे त्यांनी वेळोवेळी आम्हाला निवडून दिलं आहे.
नामदेव ताकवणे यांनी केलेल्या आरोपावर त्यांनी बोलताना, लोकशाही आहे, आरोप कुणीही करु शकतं, पण यात राजकारण कुणी करु नये. आम्ही कुणालाही कारखान्यात येण्यास मनाई केली नव्हती. निराणी ग्रुपला कारखाना का दिला असा आरोप होतो पण कारखाना कुणाला दिला की ऑनलाईन टेंडर झालं हे त्यांना माहित नसल्याने त्यांच्याकडून हे बोललं जात आहे. त्यांनी अगोदर संपूर्ण माहिती घ्यावी म्हणजे त्यांना याचं उत्तर मिळेल.
कारखाना अडचणीत असताना राऊत अगोदर कुठं होते, कारखाना अडचणीत असताना त्यांनी यात लक्ष का घातलं नाही. राऊतांना किती सिरीयस घेतलं जात हे आम्हाला विधिमंडळात पहायला मिळालं आहे अस कुल म्हणाले. राऊत यांना त्यांच्याच 14 आमदारांनी सिरीयस घेतलं नाही म्हणून त्यावर विधिमंडळात सुद्धा कुणी आवाज उठवला नाही. साखर जळाली असं म्हणतात पण तो अपघात होता, असे अपघात होत असतात त्याचं राजकारण कुणी करु नये.
राऊत यांना कोर्टात जाण्यास कुणी रोखलं आहे. अवश्य जावं, 1992 पासून ते 2023 पर्यंत त्यांनी चौकशी करावी. मी हक्कभंग समितीचा अध्यक्ष झालो त्यानंतर आरोप सुरु झाले आहेत, निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन कालची सभा झाली, कारखाना विषय फक्त नावाला होता. मुख्य उद्देश बाजार समिती निवडणूक होती. राऊत यांच्या शेजारी हे बसले असताना राऊतांनी मनी लॉंड्रिंग चे आरोप करणे हास्यास्पद आहे.
हे दूध संघाचं सांगतात पण दूध संघ स्थापन केला त्यावर या लोकांनी स्टे आणला होता. आम्ही त्यानंतर तो व्यवस्थित चालू ठेवला नंतर संघाने अमूल सोबत टायप केलं. जसं त्यांनी त्यांचं हॉटेल चालवता आलं नाही, त्यामुळे ते त्यांनी ‘मिसळ’वाल्याला चालवायला दिलं. तसाच आमचा विषय आहे. आम्ही दूध संघ टायप करून चालवायला दिला त्यात गैर काय आहे. त्यांनी माझा इतिहास काढायचा ठरवलं तर तुमचा इतिहास तपासला तर बरं होईल. पाच निवडणुकांत थोरातांनी फॉर्म भरले नाही आणि ते कारखाना चालवण्याचे बोलत आहेत. अगोदर फॉर्म भरा. आता उशीर झाला आहे. कारखाना व्यवस्थित सूरु आहे. शेतकरी, कामगार खुश आहेत त्यामुळे यात कुणी आडथळा आणू नये असे शेवटी आ.कुल म्हणाले.