Categories: Previos News

Leopard found in Kedgaon : केडगावमध्ये बिबट्या आढळला !



दौंड : सहकारनामा ऑनलाइन 

दौंड तालुक्यातील केडगावमध्ये बिबट्या सदृश प्राणी आढळून आल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे.

आज दि.14 डिसेंबर रोजी पहाटे 3 च्या सुमारास केडगाव येथील बारवकर मळा येथे रंगनाथ गायकवाड यांना हा बिबट्या दिसल्याची माहिती त्यांनी ग्रामपंचायत सदस्य नितीन जगताप यांना दिली.

रंगनाथ गायकवाड हे फुलांचा व्यवसाय करतात. आज पहाटे ते फुले भरण्यासाठी  ते उठले होते. त्यावेळी त्यांना घुलबिली येथील उसाच्या शेतामध्ये हा बिबट्या सदृश प्राणी नजरेस पडला. त्यांनी लागलीच याची माहिती ग्रामपंचायत सदस्य नितीन जगताप यांना दिली.

नितीन जगताप यांनी घटनास्थळी गेले त्यावेळी त्यांनाही तेथे बिबट्या सदृश प्राण्याच्या पंजाचे ठसे आढळून आहे आहेत. त्यांनी आपल्या मोबाईलमध्ये या ठश्यांचे फोटो काढले असून जर हा बिबट्या असेल तर नागरिकांनी सावध होणे गरजेचे बनले आहे. 

बिबट्याची माहिती नागरिकांमध्ये पसरल्यानंतर येथील शेतामध्ये काम करणारे मजूर आणि रस्त्याने ये जा करणारे नागरिक भयभीत झाले आहेत. केडगाव परिसरात उस शेती मोठ्या प्रमाणावर आहे त्यामुळे बिबट्याला राहण्यासाठी येथील वातावरण पोषक ठरू शकते त्यामुळे वेळीच या बिबट्या सदृश प्राण्याला पकडून वनविभागात सोडणे गरजेचे बनले आहे.

नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी असे आवाहन केडगाव ग्रामपंचायत सदस्य नितीन जगताप यांनी केले आहे.

Sahkarnama

Recent Posts

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

1 दिवस ago

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

2 दिवस ago

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार – मा.नगराध्यक्ष बादशाह शेख

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…

2 दिवस ago

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

2 दिवस ago

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

3 दिवस ago