‘सुभाष बाबुराव कुल’ महाविद्यालयामध्ये कायदेविषयक शिबीर संपन्न

दौंड : गुरुवार दि.16/1/2025 रोजी केडगाव येथील सुभाष बाबुराव कुल महाविद्यालयामध्ये निर्भय कन्या अभियानांतर्गत कायदेविषयी शिबीर घेण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांकडून विद्यार्थ्यांना सायबर लॉ व महिला कायदे याविषयी माहिती देण्यात आली.

सुभाष बाबुराव कुल महाविद्यालयामध्ये पार पडलेल्या या शिबिराला दौण्ड न्यायालयातील न्यायाधीश श्री काळदाते साहेब व न्यायाधीश श्री पाटील साहेब, ॲड. प्रशांत गिरमकर (अध्यक्ष, दौण्ड बार असोसिएशन ) जाधव सर, गायकवाड सर, अशोक दिवेकर सर, चंद्रकांत शेळके पाटील, धनजीभाई शेळके, ॲड. अजित दोरगे ( सचिव, दौंड बार असो. ), ॲड. आवळे, ॲड.सातपुते, ॲड.शेलार, ॲड.नरुटे
आदी उपस्थिती होते.

विद्यार्थ्यांना कायद्याचे ज्ञान मिळावे, त्यांना त्यांच्या हक्काची व जबाबदारीची जाणीव व्हावी आणि जनजागृती व्हावी म्हणून विधी सेवा समिती व दौण्ड तालुका ॲडव्होकेट बार असोसिएशन तर्फे हे शिबीर घेण्यात आले अशी माहिती दौंड बार असोसिएशन चे अध्यक्ष ॲड.प्रशांत गिरमकर यांनी दिली.