रिता शेटीया
पुणे : पद्मश्री लीला पुनावाला यांना नुकताच नवी दिल्ली येथे प्रतिष्ठित ‘महात्मा जीवनगौरव पुरस्कार’ प्रदान करून सन्मानित करण्यात आले आहे.
महात्मा पुरस्कार जगभरातील प्रभावशाली व्यक्तित्व आणि बदल घडवणाऱ्यांना देण्यात येतो. ज्या व्यक्ती विशेष सामाजिक योगदान देतात, भविष्याचा मार्ग दाखवतात, सार्वजनिक आणि विकास क्षेत्रातील सामाजिक जबाबदारी, मानवतावादी, परोपकारी, अश्या विविध सामाजिक कार्यासाठी पुढाकार घेणाऱ्यांना हा पुरस्कार देण्यात येतो.
महात्मा पुरस्काराची सुरूवात अमित सचदेवा यांनी केली होती, ज्यांना ‘भारताचा सीएसआर मॅन’ म्हणून ओळखले जाते. लीला पुनावाला फाउंडेशनच्या (एलपीएफ) अध्यक्षा लीला पुनावाला यांनी वंचित मुलींच्या व्यावसायिक शिक्षणासाठी एलपीएफच्या शिष्यवृत्तीद्वारे मोठे योगदान दिले आहे.
एलपीएफ हे भारतातील ना-नफा ना तोटा तत्वावर कार्यरत पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट आहे, ज्याची स्थापना १९९५ मध्ये लीला पुनावाला आणि फिरोज पूनावाला (संस्थापक विश्वस्त, एलपीएफ) यांनी केली होती. एलपीएफ ही एफसीआरए या विश्वासार्ह आघाडीद्वारे मान्यताप्राप्त व नोंदणीकृत संस्था आहे. एलपीएफ ने शैक्षणिकदृष्ट्या गुणवंत परंतु आर्थीकदृष्या दृर्बल व आवश्यक शैक्षणिक सुविधांचा अभाव असलेल्या मुलींना मेरिट-कम-नीड आधारित शिष्यवृत्ती प्रदान केली आहे.
उच्च शिक्षण घेण्यासाठी अनुदान शिष्यवृत्ती देऊन आजतगायत त्यांनी हजारो मुलींची मदत केली आहे. शिष्यवृत्ती सोबत वैयक्तिक आणि व्यावसायिक कौशल्य निर्माण कार्यक्रमांचे आयोजन करून महिला सक्षमीकरणासाठी पायाभूत योगदान दिले आहे. यातील मुलींना फंक्शनल, टेक्निकल, प्रोफेशनल आणि एम्पॉयबिटी स्किल्स शिकण्याची संधी मिळणार आहे.
एलपीएफने १२,००० हून अधिक मुलींना पाठिंबा दिला आहे. येथे दर वर्षी १००० हून अधिक मुलींना शिष्यवृत्ती दिली जाते. हे फाउंडेशन शालेय मुलींना त्यांच्या पदवीपर्यंतच्या शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देते हे विशेष.