नेत्यांनो, पक्षाशी एकनिष्ठ राहिलो ही आमची चूक आहे का..? वैशाली नागवडे यांचा परखड सवाल

पुणे | 23 वर्षे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये निश्वार्थीपणे काम केले, पक्षाशी एकनिष्ठ राहिलो ही आमची चूक आहे का असा परखड सवाल महानंदाच्या माजी अध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुणे जिल्हा विभागीय अध्यक्षा वैशाली नागवडे यांनी नेत्यांना विचारला आहे. संपूर्ण पुणे जिल्ह्यात वैशाली नागवडे यांची प्रतिमा ही पवार कुटुंबियांशी एकनिष्ठ आणि पक्षनिष्ठ अशी राहिली आहे.

वरील सवाल वैशाली नागवडे यांनी नेते आणि कार्यकर्त्यांना विचारला असून त्यांनी या प्रश्नातून आपला जीवन प्रवास उलगडून दाखवला आहे. वैशाली नागवडे लिहितात, पक्षासाठी प्रिय नेत्यानो व कार्यकर्त्याना , 23 वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मधे प्रामाणिकपणे काम केले. साधारण 2000 साली राजकारणाची आवड लागली. माहेरी किंवा सासरी कुठली ही राजकीय पार्श्वभूमी नसताना काम सुरु केले. केडगाव (तालुका दौंड) येथे कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट पासुन माझा प्रवास सुरु झाला. आदरणीय पवार साहेब व आदरणीय अजित दादा यांचे मार्गदर्शन घेऊन, विद्या प्रतिष्ठान बारामती यांची C-DAC ची franchaise चालवत असताना राजकारणाची गोडी लागली.

2002 साली पहिल्यांदा अण्णासाहेब पटील महामंडळ ह्या ठिकाणी संचालक म्हणून काम पहिले. 2005 साली महाराष्ट्र राज्य सहकारी दुध संघावर संचालक, 2007 साली पंचायत समिति सदस्य ही पदे मिळाली. 2007 साली खासदार सुप्रियातई सुळे ह्या राज्य सभेच्या खासदार झाल्या नंतर त्यांच्या बरोबर दौंड तालुक्यात फिरले. 2009 साली खासदार सुप्रिया ताई, बारामती लोकसभेवर निवडून गेल्या. त्याच साली मी 2009 मध्ये पुणे जिल्हा महिला राष्ट्रवादी काँग्रेस ची अध्यक्ष झाले. तेव्हा पासुन आता पर्यंत त्यांच्या बरोबर, युवती काँग्रेसच्या स्थापने पासुन महाराष्ट्र भर दौरे केले. व बारामती लोकसभा मतदार संघात दौरे केले. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मधे अनेक चढ-उतार आले. पण हाटले नाही.

अनेक वेळा अंतर्गत पार्टी मधे ही संघर्ष करावा लागला. 2013 साली महाराष्ट्र राज्य दुध संघाची अध्यक्ष झाले. दुर्दैवाने 2014 साली आपले सरकार गेले. 2014 साली BJP – Sena सरकार असताना आदरणीय एकनाथ खडसे, दुग्ध विकास मंत्री होते. रोज एक नोटीस यायची, पण समर्थपणे त्याला तोंड दिले. वेळ प्रसंगी एकनाथ खडसे साहेब यांना वस्तुस्थिति संगितली. त्या वेळेस सुधा अपल्या पार्टी मधले लोक चर्चा करायचे. पण तेच खडसे साहेब अपल्या पार्टीमधे येउन आमदार झाले.

त्या नंतर 2017 साली पुणे जिल्हा परिषद निवडणूक लागली. आदरणीय अजित दादांनी संगितले तुला निवडणूक लढवावी लागेल. 2017 साली राहु – खामगांव गट हा विद्यमान भाजप चे आमदार राहुल कुल यांचा गट. समोर पराभव दिसत असताना नेत्यानी दिलेला आदेश पाळायचा ह्या भुमिकेतुन लढले. थोड्या मतानी पराभव झाला. त्या वेळेस आमदार यांनी माझ्याकडून निवडणूक लढवा असा प्रस्ताव दिला होता, परंतु मी पदासाठी दुसर्ऱ्या पार्टी मधे जाणार नाही, ही भूमिका घेतली. त्या नंतर पुणे जिल्हा मध्यवर्ती बैंक, पुणे जिल्हा दूध संघ ह्या ठिकाणी पार्टीकडून संधी डावलली. परंतु 2014 पासुन आजतागायत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी साठी अनेक आंदोलने रस्त्यावर उतरुन केली. दौंडमधे अनेक राजकीय घडामोडी झाल्या.

रमेश अप्पा थोरात तर कधी आमदार राहुल दादा कुल यांना पार्टीमुळे साथ दिली पण पार्टीनी संगितलय, तशी कामे करत गेले. दौंड चे राजकारण व्यक्ति भोवती फिरत असताना, मी पार्टी सोडून कधीच काम केले नाही. वेळ प्रसंगी ह्याचा मला तालुक्यात राजकारण करत असताना तोटा झाला. चित्रा ताई वाघ व रुपालीताई चाकणकर प्रदेश अध्यक्ष झाल्या तेव्हा अनेक जणांना वाटले मला संधी मिळेल. तरी आशा न सोडता काम करत राहिले. प्रत्येक जण मला म्हणतात तुम्हाला पार्टीनी दिले, जरुर दिले. पण जसा एखादा पुरुष अनेक वर्ष काम करतो व अपेक्षा करतो त्या पद्धतीने मी ही केली. पुणे जिल्ह्यात साधारण 5 वर्ष लाभाचे पद उपभोगल्यानंतर, संघटनेसाठी, अंदोलनसाठी असा किती वेळ कुठल्या महिलानी दिला? हे सगळं सहन करायची आज ही तयारी होती व आहे. परंतु आज नेते वेगळे झाले, कार्यकर्त्यांची काय चुक? आज 23 वर्ष झाले, आमची काय चूक? परंतु आज अभिमान वाटतो कधी स्वतःच्या स्वार्थासाठी पार्टी बदलली नाही, पार्टीनी बडतर्फ केले. पवार कुटुंब आमचा पक्ष आमची पार्टी, परंतु कार्यकर्त्यावर हा अन्याय नाही का? एका घरात 2 दोन चुली करायला, तुम्ही आम्हाला जबाबदर धरणार का? हा प्रश्न आम्हाला पडलाय.

नेत्यानी अनेक पक्ष बदलेल्या लोकांना पार्टीमधे प्रवेश दिले, मोठ-मोठी पदे दिली कार्यकर्त्यांनी कधीच विचारल नाही, असे का? परंतु आज आमच्या नेत्यांच्या वेगळ्या भूमिकांमुळे कार्यकर्ता भोगतोय. आमचे भविष्य काय? नेते परत कधीही एक होतील, त्यांच्या कामासाठी एकमेकांकडे जातील परंतु सगळं भोगायला लागणार आम्हाला. अनेक मोठी पदे मिळालेले नेते हे वेगळ्या पार्टी मधुन आले, त्यांचे जसे नेत्यांनी स्वागत केले तसे आम्ही कार्यकर्त्यानीही केले. पण कुठलीही ही तक्रार न करता केले, मग आम्ही चुकलो का ?असो, आज पर्यंत ज्या ज्या घटकांनी मला पार्टी मधे काम करण्यासाठी मदत व सहकार्य केले त्या सर्वांची मी मनापासून आभारी आहे. एक नविन सुरुवात, पण अभिमनाने! मी पार्टी सोडली नाही, मला पार्टी मधून बडतर्फ केले.नेत्याचे अणि कार्य कर्त्याचे नाते हे फक्त एका कागदावर अस्ते का ? आम्ही तुमच्याशी मनाने जोड़लो गेलो, पण तुम्ही आम्हाला एका कागदा पर्यंत मर्यादित ठेवले.

साहेब कायमच आमचे श्रद्धास्थान आहेत व राहतिल. तुम्ही आम्ही फोटो वापरु नका साहेबांचा असे सांगीतले, पण आमच्या हृदयात अस्लेल्या फोटो चे काय ? माझ्या मनात प्रतेक राष्ट्रवादीच्या नेत्याबद्दल व कार्यकर्त्याबद्दल प्रेम व स्नेह माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत कायम राहिल , आपण ही ठेवाल ही माफक अपेक्षा करते असे वैशाली नागवडे यांनी आपल्या मनोगतामध्ये म्हटले आहे. वैशाली नागवडे ह्या सध्या अजित पवार यांच्या गटात असून त्यामुळे त्यांच्यावर शरद पवार गटाकडून बडतर्फीची कारवाई करण्यात आली आहे. त्यांना अजित पवार गटाकडून लवकरच मोठी जबाबदारी देण्यात येणार असल्याची चर्चा राजकीय गोटात रंगत आहे.