आर्थिक व्यवहारातून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या नेत्याचा अजित पवार गटाच्या सरपंचावर गोळीबार ! सरपंच जागीच ठार, तणावाचे वातावरण

बीड : राज्यात लोकसभा निवडणुका झाल्यानंतर राष्ट्रवादी च्या दोन्ही गटात मोठी धुसफूस पहायला मिळत आहे. या धुसफूशिचा कधी कधी वयक्तीत व्यवहारावर सुद्धा परिणाम होऊन एक दुसऱ्याचा जीव घेण्यापर्यंत मजल जात आहे. अशीच एक घटना बीडमधून समोर येत आहे. बीडमध्ये व्यवहारातून एका सरपंचावार गोळीबार करण्यात आला असून या गोळीबारात सरपंच जागीच ठार झाले आहेत. मृत बापू आंधळे हे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे कार्यकर्ते असल्याची माहिती मिळत आहे.

बारामती तालुक्यात पत्नी, लहान मुलीसमोरच डोक्यात गोळी झाडून निंबाळकर सरांचा खून

मिळालेल्या माहितीनुसार या गोळीबारात सरपंच या हल्ल्यात सरपंच बापू आंधळे हे ठार झाले आहेत तर अन्य एकजण जखमी झाला आहे. जखमी व्यक्तीवर अंबेजोगाई येथील दवाखान्यात उपचार सुरु असून परिसरात तणावाचे वातावरण पहायला मिळत आहे. या घटनेनंतर परळीत मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

बीडमधील परळीत शनिवारी रात्री ही गोळीबाराची घटना घडली आहे. ही घटना आर्थिक देवाण घेवाणीतून घडल्याचे फिर्यादीमध्ये नमूद करण्यात आले आहे. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण पहायला मिळत आहे. या गोळीबारात मृत्यूमुखी पडलेले सरपंच बापू आंधळे हे मरळवाडीचे होते तर त्यांसोबत जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव ग्यानबा गित्ते असे सांगितले जात आहे. परळी शहरात असलेल्या बँक कॉलनीमध्ये ही भयंकर घटना घडली आहे.

या घटनेनंतर बीडचे पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी त्वरीत घटनास्थळी भेट दिली असून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे नेते बबन गित्ते यांसह पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.