: सहकारनामा ऑनलाईन
उरुळीकांचन दत्तवाडी रोड, विघ्नहर्ता गणपती कारखान्यासमोर ता.हवेली जि.पुणे येथुन पुणे ग्रामीण एलसीबी शाखेचे पथकाने कोरोना रोग प्रतिबंधक संचारबंदी कालावधीत एका सराईताकडून एक गावठी पिस्टल व जिवंत काडतुस जप्त केलेले आहे.
पुणे जिल्हा पोलीस अधीक्षक श्री.संदिप पाटील, पुणे विभागाचे अपर पोलीस अधीक्षक श्री.विवेक पाटील यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पदमाकर घनवट यांना कोरोना रोग प्रतिबंधक संचारबंदी अनुषंगाने गुन्हे शाखेची साध्या वेशातील पथके नेमून सस्त्यावर विनाकारण फिरणारे, जिवनावश्यक वस्तुंचा काळा बाजार करणारे व इतर अवैध बेकायदा कृत्य करणारे इसमांची माहिती काढून कारवाई करणेचे आदेश दिलेले होते. त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांचे मार्गदर्शनाखाली नेमलेले स्थानिक गुन्हे शाखेतील सहा. पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुंड, महेश गायकवाड, निलेश कदम, सचिन गायकवाड, ज्ञानेश्वर क्षिरसागर, गुरु गायकवाड, सुभाष राऊत, काशिनाथ राजापुरे, प्रमोद नवले यांचे पथकास दिनांक ९ एप्रिल २०२० रोजी उरूळीकांचन परिसरात पेट्रोलिंग करीत असताना सायंकाळी इलाईट चौक येथे असताना उरुळीकांचन दत्तवाडी रोड येथे निळा टि शर्ट घातलेला पवन मिसाळ नावाचा तरूण दहशतीसाठी त्याचे कमरेला गावठी पिस्टल बाळगून फिरत आहे अशी खात्रीशीर बातमी मिळाली होती. त्यानुसार गुन्हे शाखेचे पथकाने तात्काळ दत्तवाडी रोड येथे जावून सापळा रचून बातमीतील वर्णनाप्रमाणे निळा शर्ट असलेला व संशयास्पदरित्या थांबलेला पवन उर्फ प्रशांत गोरख मिसाळ (वय २६ वर्षे रा.उरुळीकांचन, दत्तवाडी ता.हवेली जि.पुणे) याचे जवळ जाताना तो पळून जात असताना त्यास पाठलाग करून ताब्यात घेतले व त्याचेकडून विनापरवाना व बेकायदेशीर हेतुस्तव कमरेला बाळगलेले १ गावठी पिस्टल व १ जिवंत काडतुस असा एकुण किं.रु. ५०,३०० / – (पन्नास हजार तीनशे) रुपयाचा मुद्देमाल जप्त केलेला आहे. सदर आरोपीविरुद्ध लोणीकाळभोर पोलीस स्टेशनला आर्म अॅक्ट कलम ३,२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील कारवाईकामी लोणीकाळभोर पोलीस स्टेशनला जमा करण्यात आलेला आहे.
यातील आरोपी हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याचेविरूध्द यापूर्वी पुणे शहरात चंदननगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल आहे.
आरोपीने पिस्टल व काडतुस कोठून आणले? कोणत्या कारणासाठी ते जवळ बाळगले? याबाबतचा अधिक तपास लोणीकाळभोर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुरज बंडगर यांचे मार्गदर्शनाखाली सहा.पोलीस निरीक्षक राजू महानोर हे करीत आहेत.