दौंड : सहकारनामा ऑनलाइन
दौंड तालुक्यातील पाटस टोलनाक्याजवळ अल्पवयीन मुलीकडून वेश्याव्यवसाय करून घेणाऱ्या प्रवीण शिंदे या आरोपीस स्थानिक गुन्हेअन्वेषण विभागाने सापळा रचून अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार दि. ७.१०.२०२० रोजी गोपनीय बातमीदारातर्फे बातमी मिळाली की प्रवीण शिंदे नावाचा इसम हा मुलींकडून दौंड व परिसरामध्ये वेश्याव्यवसाय करून घेत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांना मिळाली होती त्यानुसार त्यांनी त्यांच्या पथकाला कारवाई बाबतचे आदेश दिले होते.
पाटस गावचे हद्दीत टोल नाक्याजवळ सोलापूर पुणे लेनचे दक्षिणेस सुलभ शौचालयाचे पश्चिमेस मोकळे जागेत आरोपी प्रवीण रामदास शिंदे (वय २७ रा.यळपणे ता.श्रीगोंदा जि.अहमदनगर) हा पीडित मुलगी (वय वर्षे १७ रा.दौंड ता.दौंड जि. पुणे) हिचे कडून अनैतिक शारीरिक व्यापार करवून घेताना मिळून आला.
यावेळी त्यांच्याकडून एकूण ३९,१००. रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात येऊन आरोपी विरुद्ध यवत पोलिस स्टेशन येथे स्त्रिया व मुली अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायदा १९५६ चे कलम ४,५,७, व ८ प्रमाणे कारवाई करण्यात आली आहे.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, मिलिंद मोहिते अप्पर पोलीस अधीक्षक बारामती, यांचे आदेशान्वये पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि/पृथ्वीराज ताटे, सफौ/सागर चव्हाण, पोहवा/मुकुंद अयाचीत, पोहवा/महेश गायकवाड, पोहवा/निलेश कदम, पोहवा/उमाकांत कुंजीर, पोहवा/सचिन गायकवाड, पोहवा/लता जगताप, पोना/सुभाष राऊत,
पोना/गुरुनाथ गायकवाड, पोशि/अक्षय जावळे यांनी केली.