पुणे : सहकारनामा ऑनलाइन
पुणे जिल्ह्यातील लोणीकंद पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये दि 23/9/2020 रोजी भाड्याने गाडी बोलावून ड्रायव्हरला कोयता लावून जीवे मारण्याची धमकी देऊन मारुती सुजूकी कंपनीची इर्टीगा कार तसेच सॅमसंग कंपनीचा मोबाईल आणि रोख 10 हजार रुपये असा एकूण 1 लाख 70 हजार किंमतीचा मुद्देमाल चोरीस गेला होता.
त्यानुसार समांतर तपास करीत असताना मिळालेल्या माहिती वरून कोरेगाव भीमा येथे सापळा रचून या घटनेतील आरोपी भूषण शरद माळी (वय 19 वर्षे रा वाडा पुनर्वसन ता शिरूर जि पुणे) यास ताब्यात घेऊन चौकशी केली असता सदरच्या आरोपीकडून गुन्ह्यात वापरलेला रियल मी कंपनीचा मोबाईल किंमत अंदाजे 2 हजार तसेच गुन्हा करताना वापरलेली होंडा ड्रीम युगा कंपनीची 25 हजार रुपयांची मोटार सायकल असा एकूण 27 हजारचा मुद्देमाल जप्त करून त्यास जेरबंद करण्यात आले.
सदरील गुन्ह्यात वापरलेला मोबाईल हा देखील शिक्रापूर पोलिस स्टेशन शार्प कंपनीच्या मागील गेटच्या जवळ एका इसमास कोयत्याचा धाक दाखवून चोरलेला असल्याचे निष्पन्न झाले असून सदरच्या मोबाईल मधील सिम कार्ड देखील शिक्रापूर पोलिस स्टेशनच्या हद्दीतील हरगुडे वस्ती येथे एक इसमास कोयत्याचा धाक दाखवून चोरी केलेले आहे.
सदरील दोन्ही गुन्हे दाखल करण्याची तजवीज ठेवण्यात आली असून शिक्रापूर पोलिस स्टेशन ला कळविण्यात आले आहे. वरील सर्व गुन्हे आरोपीने त्याचा भाऊ १) किशोर शरद माळी (वय 17 वर्षे रा वाडा पूनर्वसन ता. शिरूर जि पुणे) २) सागर पिंगळे (वय 22 वर्षे रावाडा पुनर्वसन ता.शिरूर) यांच्या सहकार्याने केले असल्याचे सांगत आहे.
सदरील आरोपी अटक करण्याची तजवीज ठेवली असून यातील अटक आरोपीस पुढील तपास करीता लोणीकंद पोलिस स्टेशन च्या ताब्यात देण्यात आले आहे.
सदरील कारवाई ही स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्री पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक शिवाजी ननावरे , पोलिस नाईक विजय कांचन, पोलिस नाईक राजू मोमिन, पोलिस शिपाई धिरज जाधव यांनी केलेली आहे