| सहकारनामा |
पुणे : तांदूळवाडी ता.बारामती येथील चोरीचा गुन्हा उघडकीस आणून चोरट्याला मुद्देमालासह जेरबंद करण्यात पुणे ग्रा. LCB पथकाला यश आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार दि.३१/१/२०२१ रोजी १२.०० ते दि.१/२/२०२१ रोजी ०५.०० वा. चे दरम्यान कोणीतरी अज्ञात चोरटयाने संतोष मानसिंग चव्हाण (रा.कल्याणीनगर, तांदूळवाडी ता.बारामती) यांच्या घराच्या दरवाजातून आत प्रवेश करत ५०,०००/- रुपये रोख रक्कम, एक होंडा शाईन मोटरसायकल, दोन मोबाईल व एक तोळा सोन्याची चैन असा एकूण ९९,०००/- रुपयाचा माल चोरुन नेलेला होता. त्याबाबत फिर्यादी संतोष चव्हाण यांनी बारामती तालुका पो.स्टे येथे गुन्हा दाखल केला होता.
सदर गुन्ह्याचा समांतर तपास करीत असताना LCB टिमला मिळालेल्या माहितीनुसार आरोपी सुनिल मनोहर राठोड (वय २५ रा.मदभावी एलटी नं.१ ता.जि.विजापूर कर्नाटक) यास तरळे (कणकवली) जि.सिंधुदुर्ग येथून गुन्हयातील चोरलेली शाईन मोटरसायकल व दोन मोबाईलसह असा किं.रु.१९,०००/- चे मालासह ताब्यात घेण्यात आले.
सदर आरोपीची वैदयकिय तपासणी करुन त्यास बारामती तालुका पोलीस स्टेशनचे ताब्यात देण्यात आले.
सदरची कामगिरी ही मा.पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख सो., बारामती विभाग अपर पोलिस अधीक्षक श्री.मिलींद मोहिते सो. यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री.पद्माकर घनवट,पोहवा. महेश गायकवाड,
पोहवा. निलेश कदम, पोहवा. सचिन गायकवाड,पोहवा. ज्ञानदेव क्षिरसागर, पोहवा. काशिनाथ राजापुरे यांनी केली.