शिरूरमध्ये तरुणावर गोळीबार करून तलवार, कोयत्याने हल्ला, एका दिवसातच LCB ने ठोकल्या आरोपींना बेड्या



पुणे : सहकारनामा

शिरुरमध्ये तरुणावर गोळीबार करून त्याचा कोयत्याने खून करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याने  सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. 

हा गोळीबार शिरूर शहरातील चौकात झाल्याने एकच खळबळ माजली होती. मात्र पुणे ग्रामिण स्थानिक गुन्हेअन्वेषण विभाग (LCB) ने एका दिवसातच आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार दि. 26 रोजी सायंकाळच्या सुमारास प्रविण गोकुळ गव्हाणे (वय.24 रा.पाबळ फाटा) हे त्यांच्या बुलेट वरुन शिरूर मधील व्हीजन स्कुल समोरुन जात असताना दुचाकीवरुन आलेल्या दोन अज्ञात इसमांनी प्रवीण गव्हाणे यांना मोटारसायकल आडवी मारुन कोयता आणि तलवारीने वार करण्यास सुरुवात केली यावेळी गव्हाणे यांनी दुचाकी तेथेच सोडून पळ काढला. यावेळी त्यातील एकाने गव्हाणे यांच्या दिशेने हातातील पिस्तुलातून गोळ्या झाडल्या मात्र त्या गोळ्या चुकविण्यात गव्हाणे यांना यश आले. 

याबाबत शिरूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदरचा गुन्हा हा गंभीर स्वरूपाचा असल्याने आरोपींना पकडण्याचे पोलिसांसमोर आव्हान होते. त्यामुळे पुणे ग्रामिण पोलीस अधीक्षक डॉ.देशमुख यांनी आरोपींना पकडण्यासाठी सूचना दिल्या होत्या. गुन्ह्यातील आरोपी गोपाळ उर्फ गोप्या संजय यादव व त्याच्या सोबत असणारा अभिजीत उर्फ जपानी कृष्णा भोसले या दोघांना सासवड येथून ताब्यात घेण्यात पोलिसांना यह आले. 

त्यांच्याकडे गुन्ह्याच्या अनुशंगाने तपास केला असता आरोपी गोपाळ यादव याने फिर्यादीस जिवे ठार मारण्याकरीता त्याचे साथिदार शुभम सतिश पवार (रा. पापडेवस्ती भेकराईनगर  पुणे) अभिजीत उर्फ जपानी कृष्णा भोसले (रा . भेकराईनगर पुणे)  शुभम विजय पांचाळ (रा . हडपसर पुणे)  निशांत भगवान भगत (रा.भेकराईनगर फुरसुंगी  पुणे) आदित्य औदुंबर डंबरे (रा. ससाणेनगर  हडपसर पुणे ) शुभम उर्फ बंटी किसन यादव  (रा.गोंधळेनगर हडपसर , पुणे) यांना सुपारी दिली असल्याची माहीती दिली त्यानुसार आरोपींना त्यांच्या राहत्या घरातून ताब्यात घेवून चौकशी केली असता आरोपींनी प्रत्यक्ष घटनास्थळी जावून व आरोपी यांनी गुन्हा करणेकरीता पिस्टल पुरवून गुन्हा केला असल्याचे निष्पन्न झाले आहे. या घटनेतील आरोपींवर विविध गुन्हे दाखल असून त्यांनी  एन. के साम्राज्य या ग्रुपच्या माध्यमातून अत्याचार केलेबाबत काही तक्रारी असल्यास नागरीकांनी कोणतीही भिती न बाळगता पुढे येवून तक्रारी द्याव्यात असे आवाहन पुणे ग्रामीण पोलिसांनी केले आहे.

गोळीबाराच्या घटनेनंतर पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अपर पोलीस अधीक्षक मिलींद मोहीते, उप विभागीय पोलीस अधिकारी राहुल धस यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांना सुचना दिलेल्या होत्या त्याप्रमाणे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी स.पो.नि. पृथ्वीराज ताटे, पोसई शिवाजी ननवरे, सहा.फौजदार दत्तात्रय गिरमकर, पोहवा राजु पुणेकर, उमाकांत कुंजीर, जनार्दन शेळके, पोना. राजु मोमीण, अजित भुजबळ, विजय कांचन, गुरू जाधव, मंगेश थिगळे, पो.कॉ. धिरज जाधव, अक्षय नवले, बाळासाहेब खडके, दगडु विरकर, समाधान नाईकनवरे यांचे पथक तयार करून तपासकामी रवाना केले होते.

स्थानिक गुन्हे शाखा पथकाने गोपनीय बातमीदाराकडून बातमी काढून सासवड पो.स्टे.चे पो.नि.आण्णासाहेब घोलप स.पो.नि.श्री.राहुल घुगे , पो.कॉ.निलेश जाधव, उगले, डहाणे यांसह आरोपींना जेरबंद करण्याची कारवाई केली आहे.