दौंड – रावणगाव येथील ट्रॅक्टर चोरीचा गुन्हा उघडकीस : पुणे ग्रामीण LCB शाखेची कामगिरी



दौंड : सहकारनामा ऑनलाईन

दौंड तालुक्यातील रावणगाव येथे दिनांक ८ सप्टेंबर रोजी रात्री १० ते दिनांक ९ सप्टेंबर रोजी पहाटे ०४.३० वाजण्याच्या दरम्यान  शिरसाई दूध डेअरी जवळ फिर्यादी यांचे घरा समोरून त्यांचा महिंद्रा कंपनीचा ६ लाख ८० हजार रुपयांचा ट्रॅक्टर अज्ञात चोरट्यांनी फिर्यादी यांच्या संमती शिवाय लबाडीचे इराद्याने चोरी करून नेला होता. त्याबाबत दौंड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला होता.

दि.२१ सप्टेंबर रोजी LCB टिमला रावणगाव ता.दौंड जि. पुणे येथे सदर ट्रॅक्टर चोरीतील तीन इसम असल्याची माहिती समजल्याने त्यांनी त्या ठिकाणी जाऊन आरोपी – १) गणेश नंदकुमार भागवत (वय  २५ वर्षे रा.पाटस ता.दौंड जि.पुणे) २) बाबासाहेब उर्फ भाऊ गाढवे (वय २७ वर्षे) ३) मंगेश गाढवे (वय २६ दोन्ही रा.रावणगाव ता.दौंड जि.पुणे) या तिघांना ताब्यात घेवून त्यांचेकडे सखोल चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.

चोरी केलेला ट्रॅक्टर प्रवीण उर्फ भैय्या बबन हरणावळ (रा.श्रीराम सोसायटी इंदापूर) याला विकल्याचे सांगितले. सदरचा ट्रॅक्टर किंमत रुपये ६,८०,०००/- हा पोलिसांनी जप्त करून तीनही आरोपींची वैदयकिय तपासणी करत त्यांना दौंड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. 

वरील कामगिरी हि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री.पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शिवाजी ननावरे, पोहवा. महेश गायकवाड, निलेश कदम, सचिन गायकवाड, पो.ना.सुभाष राऊत, गुरु गायकवाड, चा.पो.शि.अक्षय जावळे यांनी केली.