यवत परिसरात गावठी पिस्तुल घेऊन फिरणाऱ्यास ‛LCB’ कडून अटक



पुणे : सहकारनामा ऑनलाइन 

दौंड तालुक्यातील यवत परिसरात गावठी पिस्तुल घेऊन फिरणाऱ्या युवकास LCB टीमने जेरबंद केले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार दि.19 नोव्हेंबर रोजी LCB टीम यवत पोलिस स्टेशन हद्दीत एका फरारी आरोपीचा शोध घेत असताना भुलेशवर फाटा येथे एक इसम गावठी पिस्तुल स्वतः जवळ बाळगून एक मोटार सायकल घेऊन वारंवार फिरत असल्याचे समजले. या माहितीवरून सदर ठिकाणी LCB पथकाने सापळा रचून संशयित फिरणाऱ्या इसमास त्याच्या गाडीसह ताब्यात घेतले. सदर इसमाची अंग झडती घेतली असता त्याच्या कंबरेला मागील बाजूस पॅन्टच्या आत एक लोखंडी वस्तू खोचलेली मिळून आली.

सदर ची वस्तू ही बाहेर काढून पाहिली असता ते गावठी बनावटीचे पिस्तुल असल्याचे आढळून आले. सदर इसमाचे नाव इम्रान बूरहान पिंजारी (वय 23 वर्षे  रा आव्हाळ वाडी रोड वाघोली ता हवेली जि पुणे मूळ रा देगलूर नाका नांदेड जि नांदेड)  असे असून पोलिसांनी त्याला त्याच्या गाडी सहित ताब्यात घेऊन यवत पोलिस स्टेशन येथे भारतीय हत्यार कायदा कलम ३(२५) मु.पो.का.क १३५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

सदरच्या इसमाकडून 40 हजार रुपयांचे लोखंडी गावठी बनावटीचे पिस्तुल तसेच 20 हजार रुपयांची एक काळ्या रंगाची लाल पट्टे असलेली बजाज कंपनीची मोटार सायकल असा एकूण 60 हजार रुपयांचा  मुद्देमाल जप्त करण्यात आला असून त्यास पुढील तपासकामी यवत पोलिस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.

सदरची कारवाई ही पुणे ग्रामिण चे पोलिस अधिक्षक अभिनव देशमुख सो, अप्पर पोलिस अधिक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट, पोलिस उपनिरीक्षक शिवाजी ननवरे, पो हवा अनिल काळे, पो हवा रविराज कोकरे, पो हवा काशीनाथ राजपुरे, पो ना विजय कांचन, पो ना अभिजित एकशिंगे, पो कॉ धिरज जाधव  यवत पोलीस स्टेशनचे एएसआय जगताप पो.कॉ तानाजी साबळे पो कॉ किरण तुपे,पो कॉ विजय आव्हाळे यांनी केली आहे.