Categories: Previos News

शेतकऱ्यांचा कांदा चोरणारी टोळी LCB पथकाकडून जेरबंद



पुणे : सहकारनामा ऑनलाइन

फेब्रुवारी महिन्यात कांद्याचे दर हे गगनाला भिडलेले असताना दि. ७ फेब्रुवारी रोजी रामदास कुंडलिक कड वय 58 ,व्यवसाय-शेती ,रा. सोरतापवाडी यांच्या शेतीमधून अज्ञात चोरट्यांनी ७०,००० रुपयांचा कांदा चोरून नेला होता या प्रकरणी पुणे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागा (LCB) ने गुप्तपणे तपास करत मोठ्या शिताफीने आरोपींना जेरबंद केले आहे.

लोणीकळभोर पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला होता ज्यामध्ये फिर्यादी शेतकरी कड यांनी त्यांच्या शेतामधून ३५०० किलो, अंदाजे किंमत ७०,००० रु.चा कांदा चोरीला गेला असल्याची फिर्याद दिली होती. सदर गुन्ह्याचा समांतर तपास करीत असताना LCB टीमला गुप्त खबऱ्यामार्फत  मिळालेल्या बातमी वरून सौरभ दत्तात्रय महाडिक (वय २१ वर्षे रा. शितोळे मळा शिंदावणे ,ता. हवेली जि. पुणे) आकाश अशोक माने ( वय १९ वर्षे रा उरुळी कांचन ता. हवेली जि. पुणे) आकाश युवराज माने (वय १९ वर्षे रा बोरिभडक ता. दौड जि. पुणे) यांनीच हा गुन्हा केल्याचे समजले यावरून LCB ने समांतर तपास केला असता वरील आरोपींनी हा गुन्हा केल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांना बोरिऐंदी येथील टायर फाटा येथून सापळा रचून अतिशय शिताफीने पकडून त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता सदरचा गुन्हा त्यांनीच केल्याचे सांगितले. सदरील गुन्ह्यातील चोरून नेलेले कांदे हे चारचाकी वाहनात भरून  अहमदनगर येथे कांदा बाजारात नेवून विकल्याचे आरोपींनी सांगितले आहे. LCB ने आरोपींना पुढील तपासाकामी  लोणी काळभोर पोलिसांच्या ताब्यात दिले असून सदरची कामगिरी ही स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली पो.उप.नि रामेश्वर धोंडगे ,पोना विजय कांचन, पो.कॉ धीरज जाधव, पो.हवा. काशिनाथ राजापुरे  यांच्या पथकाने केली.

Sahkarnama

Recent Posts

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

1 दिवस ago

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

2 दिवस ago

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार – मा.नगराध्यक्ष बादशाह शेख

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…

2 दिवस ago

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

2 दिवस ago

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

3 दिवस ago