यवत परिसरात पिस्तूल घेऊन फिरणाऱ्या दोघांना LCB कडून अटक, पिस्तूल आणि काडतूस जप्त

यवत (दौंड) : यवत पोलिस स्टेशन हद्दीत पिस्तूल घेऊन फिरणाऱ्या तरुणास आणि त्याच्या साथीदारास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले आहे. ही घटना दि.२९/०४/२०२४ रोजी घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार स्थानिक गुन्हे शाखा पथक लोकसभा निवडणुक संदर्भाने पेट्रोलिंग करीत असताना सहजपूर फाटा (ता. दौंड) येथे एक इसम आपल्या कब्ज्यात गावठी पिस्तुल घेऊन फिरत असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास मिळाली. सदर बातमीच्या अनुषंगाने वरील पोलिस पथकाने सहजपूर येथे जाऊन सापळा रचून अथर्व संदीप जाधव (वय १८ वर्षे रा. गोंधळे नगर हडपसर ता.हवेली जि. पुणे) यास  पंचा समक्ष ताब्यात घेऊन त्याची अंग झडती घेतली असता त्याच्या कमरेला मागील बाजूस पँट च्या आत एक लोखंडी गावठी बनावटीचे पिस्टल मिळून आले.

हेही पहा

ते पिस्तूल त्याचा मित्र विजय बाळकृष्ण नेटके याचे असल्याचे त्याने सांगितले. त्यावरुन  विजय बाळकृष्ण नेटके (रा. देलवडी ता. दौंड जि. पुणे) यास देखील ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून 35 हजारांचे एक गावठी बनावटीचे लोखंडी पिस्टल आणि 100 रुपयांचे एक जिवंत काडतुस असा एकूण 35,100 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. वरील आरोपी विरुद्ध भा.ह.कायदा कलम ३ (२५) महा.पोलीस का कलम १३५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास कामी यवत पोलीस स्टेशन च्या ताब्यात देण्यात आले आहे.

सदरची कारवाई ही पुणे ग्रामिण पोलीस अधिक्षक पंकज देशमुख, अप्पर पोलीस अधिक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी स्वप्नील जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, पो उप निरीक्षक प्रदीप चौधरी, पो हवा विजय कांचन, पो हवा अतुल डेरे, पो ना अमोल शेडगे, पो शि धिरज जाधव यांनी केली आहे.