Categories: Previos News

कपडे खरेदी करण्याचा बहाण्याने ‛यवत’ मध्ये मोबाईल चोरणाऱ्या दोघांना ‛LCB’ ने केली अटक



पुणे : सहकारनामा ऑनलाइन

यवत ता.दौंड येथील दुकानामध्ये कपडे खरेदीच्या बहाण्याने आलेल्या इसमांनी मोबाईल चोरी केल्याची घटना उघडकीस आली असून या प्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग LCB ने दोन जणांना अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार यवत पोलिस स्टेशनमध्ये गु र नं  ८३३/२०२० भा.द.वी.का.कलम 379 नुसार दाखल आहे. सदरच्या गुन्ह्यात फिर्यादी यांचे यवत रेल्वे स्टेशन रोडवर महिमा कलेक्शन नावाचे कपड्याचे दुकान असल्याचे नमूद असून दि.२७/८/२०२० रोजी सकाळी ११:०० च्या दरम्यान दोन अज्ञात इसम कपडे खरेदी करण्यासाठी आले होते. सदरच्या  2 अनोळखी इसमांनी दुकानात असलेला सॅमसंग  कंपनीचा j6  मॉडेलचा 9000 रुपये किमतीचा मोबाईल  चोरून घेऊन गेले होते.

सदर गुन्ह्यातील चोरीस गेलेला मोबाईल व आरोपींचा स्थानिक गुन्हे शाखेकडून समांतर तपास करत असताना सदरच्या गुन्ह्यातील मोबाईल हा अल्ताफ  कय्युम मन्सुरी (रा. हडपसर) हा वापरत असलेबाबत माहिती मिळाल्याने त्याचा शोध घेऊन त्यास थेऊर फाटा परिसरात ताब्यात घेण्यात आले. त्यावेळी त्याचे जवळ गुन्ह्यातील चोरीस गेलेला मोबाईल मिळून आला. त्याच्याकडे मोबाईल बाबत अधिक विचारपूस करता त्याने सदरचा मोबाईल त्याचा मित्र मोहसीन जब्बार बागवान याच्याकडून विकत घेतला असल्याचे सांगितलेने त्यासही ताब्यात घेण्यात आले.

ताब्यात घेण्यात आलेले इसम नामे  १)मोहसीन जब्बार  बागवान (वय 24 वर्षे रा हडपसर पांढरे मळा पुणे) 

 २) अल्ताफ कय्युम मन्सुरी (वय 21 वर्षे रा हडपसर 15 नंबर लोखंडी पूल हडपसर पुणे) यांना   गुन्ह्यातील चोरीस गेलेले मोबाइलसह पुढील तपास कामी यवत पोलिस स्टेशनच्या ताब्यात दिले आहे.

सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख व माननीय अपर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते सो. यांचे आदेशानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक शिवाजी ननावरे, सहा पो फो दत्तात्रय गिरीमकर, पो हवा उमाकांत कुंजीर, पो ना विजय कांचन, पो ना जनार्दन शेळके, पो ना राजू मोमिन, पो शि धिरज जाधव यांनी केली आहे.

Sahkarnama

Recent Posts

तिकीट द्या म्हणून ज्यांची केली जातेय विनवनी, त्यांनी भरसभेत ‘कुलांच्या’ कार्य, संस्कारांची दिली पावती

तिकीट द्या म्हणून ज्यांची केली जातेय विनवनी, त्यांनी भरसभेत ‘कुलांच्या’ संस्कारांची दिली पावती

16 तास ago

दौंडमध्ये महाविकास आघाडीची बैठक संपन्न | दौंड विधानसभेसाठी आयात उमेदवारांना संधी नाही |  कामाला लागा.. पक्ष श्रेष्ठिचा आदेश 

दौंडमध्ये महाविकास आघाडीची बैठक संपन्न | दौंड विधानसभेसाठी आयात उमेदवारांना संधी नाही

2 दिवस ago

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

3 दिवस ago

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

4 दिवस ago

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार – मा.नगराध्यक्ष बादशाह शेख

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…

4 दिवस ago

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

4 दिवस ago