महिलेचा खून करून दागिने घेऊन पसार झालेला आरोपी LCB ने अवघ्या काही तासांत केला जेरबंद



पुणे : सहकारनामा ऑनलाइन

जेष्ठ महिलेचा खून करून तिच्या अंगावरील दागिने घेऊन पसार झालेल्या आरोपीला पुणे ग्रामिण LCB टीमने अवघ्या 24 तासांत जेरबंद केले आहे.

मिळालेल्या माहिती नुसार दि. 04/12/2020 रोजी बापू पांडुरंग साळवे (राहणार साकोरी तालुका जुन्नर जिल्हा पुणे) यांनी आळेफाटा पोलीस स्टेशनला फिर्याद दिली की आरोपी अर्जून शुभनारायण प्रसाद (सध्या राहणार ब्राह्मण मळा साकोरी तालुका जुन्नर जिल्हा पुणे मूळ राहणार खबशी थाना बनियापुर छपरा जिल्हा सारण राज्य बिहार)  याने दि. 04/12/2020  रोजी सकाळी 10:00 वा.चे सुमारास मौजे चोरे मळा साकोरी ता.जुन्नर, जि. पुणे येथे बहीण नामे सौ जानकूबाई अर्जुन चोरे (वय 65 वर्ष) हिला आमचे गावातील पप्पू जाधव यांचे खोलीत भाड्याने राहणारा बिहारी भैया अर्जुन शुभ नारायण प्रसाद याने सायंकाळी 06:30 वाजण्याच्या पूर्वी कशाने तरी डोक्यात मारहाण करून जीवे ठार मारले आहे व तिचे अंगावरील एकूण अंदाजे पाच तोळे सोन्याचे दागिने काढून घेऊन कोणाला काही संशय येऊ नये म्हणून घराचे दरवाजे बाहेर कुलूप लावून पळून गेला आहे.

वरील फिर्यादीवरून आळेफाटा पोलीस स्टेशनला भा.द.वि. कलम ३०२,२०१ अन्वये गुन्हा दाखल झाल्याने पुणे ग्रामीण पोलिस अधिक्षक अभिनव देशमुख सो यांजकडून सदर गुन्हयातील फरार आरोपी शोध घेउन कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले होते.

वरील आदेशा नुसार स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीणचे खेड-जुन्नर पथक यांनी सदर गुन्हयातील आरोपी हा बिहारी असल्याने तो गुन्हा घडले नंतर बिहार येथे जान्याकरीता रेल्वेचा उपयोग करील या अंदाजाने माहिती घेउन नाशिकरोड रेल्वे स्टेशन येथे सापळा रचला होता.

यावेळी आरोपी नामे अर्जून शुभनारायण प्रसाद हा तेथे आढळून येताच त्यास  ताब्यात घेउन सदर गुन्ह्याच्या कामी आळेफाटा पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले.

सदरची कारवाई ही पोलिस अधीक्षक अभिनव देशमुख सो यांच्या आदेशाने तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट सो. यांचे व पो.नि. श्री.पवार, आळेफाटा पो.स्टे. यांचे मार्गदर्शन खाली पो.हवा. विक्रम तापकीर,  पो.ना. दिपक साबळे, पो.कॉं. संदिप वारे, पो.काँ. निलेश सुपेकर, पो.हवा. सचिन गायकवाड, पो.ना. राजु मोमीन, पो.ना.निलेश कारखेले, आळेफाटा पो.स्टे.  पो.काँ. सचिन डामसे, आळेफाटा पो.स्टे. यांनी केली आहे.